Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Onion Rates : शेतकऱ्याची दिवाळी होणार दणक्यात! कांदा भावात होणार मोठी वाढ

0

Maharashtra Onion Rates मागील 8 महिन्यांपासून कांदा स्थिर होते. आता दसरा-दिवाळीच्या काळात कांदा उसळी घेतली आहे. मागील आठवड्यापर्यंत 7 ते 10 रुपये किलो असलेल्या कांद्याचे दर आता थेट 15 ते 25 रुपये किलोदरम्यान गेले आहेत. काही ठिकाणी कांदा 30 रुपयांहूनही जास्त किमतीला विकला जात आहे.

Maharashtra Onion Rates ‘या’ कारणामुळे बाजारात होणार मोठी वाढ :


परतीच्या पावसाने लांबवलेला मुक्काम, परिणामी संकटात सापडलेली नवीन लागवड, त्यामुळे कांद्याच्या दरात तेजी येण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात हे दर असेच वाढत राहणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्तवत असल्याने दिवाळीत कांदा रडवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Maharashtra Onion Rates

महाराष्ट्रात पावसानेही मुक्काम लांबवला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळीला पाणी लागले आणि त्यामुळे कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. हा भिजत चाललेला कांदा जास्त वेळ साठवून ठेवता येणार नसल्याने शेतकऱ्यांना हा कांदा बाजारात पाठवावा लागणार आहे. दुसरीकडे आता लावलेली कांद्याची नवीन रोपेही पावसाच्या पाण्यात सापडली आहेत.

अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे पुढील हंगामात कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी कांदा कुठून आणणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी आत्ताच कांद्याची खरेदी वाढविण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, अचानक बाजारात कांद्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे दरही वाढू लागले आहेत.

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असणाऱ्या लालसगावमध्येही कांद्याच्या दरांचा (Maharashtra Onion rates) आलेख वाढत असल्यामुळं आता तुमच्या घरानजीक असणाऱ्या बाजारपेठांमध्येही कांदा रडवणार अशीच चिन्हं दिसत आहेत.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.