Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Breaking News : आताच्या घडीच्या राजकीय क्षेत्रातील 2 सर्वात मोठ्या घडामोडी

0

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ-मोठ्या घडामोडी घडत आहेत. कुठे आमदारांच्या अपघाताची मालिका सुरु आहेत तर कुठे सरकार व विरोधकांमध्ये वादविवाद सुरु आहे. आज सकाळी देखील महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठा घडामोडी घडल्याअसून सध्या सर्वात या दोनीही घडामोडीवर चर्चा सुरु आहे.. नेमके काय घडले सकाळ पासून जाणून घेऊया थोडक्यात..

माजी मंत्री बच्चू कडू यांचा भीषण अपघात, बच्चू कडू गंभीर जखमी..: मागील काही दिवसांपासून राज्यातील आमदारांच्या अपघाताची मालिकाच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे, यांनतर राष्ट्रवादी नेते व आमदार धनंजय मुंडे, तसेच शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाला होता. त्यातच आज सकाळी प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे.

आज ( ११ जानेवारी ) सकाळी अमरावतीत सहा ते साडेसहाच्या दरम्यान बच्चू कडू रस्ता ओलांडत होते. तेव्हा एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू गंभीर जखमी झाले आहेत. अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु असून, डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. तसेच, बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड..: माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) धाड टाकली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. कारखानातल्या 100 कोटी घोटाळ्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळेच ईडी आणि आयकर विभागाने ही धाड टाकली आहे. .

ईडी आणि आयकर विभागाचे 20 अधिकारी आज पहाटे 6.30 वाजता हसन मुश्रीफ यांच्या घरी आले. व घराची तपासणी सुरु केली. महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर हि पहिलीच मोठी घडामोड असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews