
Globe Awards 2023 : संपूर्ण जगात भारताचा डंका!! या गाण्याला मिळाला जगातील सर्वात मोठा गोल्डन ग्लोब्स पुरस्कार
काल उशिरा लॉस एंजिलिसमध्ये 80 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात भारतीय सिनेसृष्टीने एक इतिहास रचला आहे. या सोहळ्यात बहुचर्चित ‘आरआरआर’ (RRR) या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली आहेत. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार ‘आरआरआर’ मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला आहे. तर तसेच बेस्ट पिक्चर (नॉन-इंग्लिश) या कॅटेगिरीमधील नामांकन देखील आरआरआर या चित्रपटाला मिळाल आहे.
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार नाटू नाटू या गाण्यानं पटकावला आहे. संगीतकार एम एम कीरावानी यांनी स्टेजवर जाऊन हा पुरस्कार स्विकारला. यावेळी पुरस्कार स्विकारल्यानंतर एम एम कीरावानी यांनी भावना व्यक्त केल्या.
यावेळी एम एम कीरावानी म्हणाले :
‘हा पुरस्कार आम्हाला दिल्याबद्दल मी आभार मानतो. मला खूप आनंद होत आहे. माझी पत्नी यावेळी उपस्थित आहे. हा पुरस्कार आरआरआर या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा आहे. त्यांनी माझ्या कामावर विश्वास ठेवला तसेच त्यांनी मला सपोर्ट केला, याबद्दल मी त्याचे आभार मानतो.’ यावेळी आरआरआर चित्रपटाच्या टीमनं टाळ्यांचा कडकडाट केला.
दरम्यान, जागतिक पातळीवर RRR ने 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. याआधी न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल अवॉर्डमध्ये राजामौली यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.