Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Livestock Housing : गाई-म्हशींची गोठा कसा असावा? जाणून घ्या योग्य पद्धत व फायदे

0

Livestock Housing पशुपालन व्यवसाय जरी वंश परंपरागत व्यवसाय असला तरी, काळानुसार या व्यवसायात आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. शेतीला जोडधंदा म्हणून ओळख असलेल्या या क्षेत्राकडे आजकालचे लोक व्यवसाय म्हणून बघू लागले आहेत. या ववसायाला जर तुम्ही व्यवसायिक दृष्टीकोनातून पाहत असाल तर पशुपालनात तुम्हाला जनावरांचे आहार आणि गोठा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे.

Livestock Housing कारण आपल्या सर्वांना माहिती आहे कि, गाई-म्हशींची जर गोठा चांगला असेल तर त्या जनावरांचे स्वास्थ्य चांगले राहते, एवढेच नव्हे तर जनावरांचे दुग्धउत्पादन देखील वाढते. यामुळे गोठा बांधताना कधीही शेताच्या उंचावर असलेली कठीण व सपाट जागा निवडावी,जेणेकरून गोठ्यातील मलमूत्र, सांडपाणी याची विल्हेवाट व्यवस्थित लावता येईल. गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी. चाऱ्यासाठी योग्य प्रकारची गव्हाण आणि प्रत्येक जनावरास हालचालीसाठी पुरेशी जागा मिळेल याची काळजी घ्यावी. यामुळे अनेक शेतकरी बांधव मुक्त संचार गोठा पद्धतीचा उपयोग करतात.

Livestock Housing मुक्तसंचार गोठा पद्धत म्हणजे काय? :

▪️ मुक्तसंचार गोठ्या मध्ये गाईंना बांधले जात नाही.
▪️ गाईंना एका मोठ्या कंपाऊंड मध्ये शेड बांधून मोकळे सोडले जाते.
▪️ त्यांच्या चाऱ्याची व पाणी पिण्याची व्यवस्था तिथेच गव्हाणा मध्ये करण्यात येते.
▪️ शेण वारंवार काढले जात नाही.
▪️ गाई एकमेकांना मारत नाहीत.

Livestock Housing मुक्त संचार गोठा पद्धतीचे फायदे :

▪️ मुक्त संचार गोठा पद्धतीत स्वच्छतेसाठी कमी वेळ लागतो तसेच मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते.
▪️ यापद्धतीत कमी मनुष्यबळ लागते.
▪️ गोठे बांधण्यावरील खर्च कमी होतो.
▪️ खाद्य,चारा व पाणी यांचा योग्य उपयोग होतो.
▪️ जनावरांना व्यायाम मिळाल्याने ते निरोगी राहतात.
▪️ स्तनदाहाचे प्रमाण कमी होते.
▪️ जनावरे मुक्तपणे माज दाखवतात.
▪️ ताण कमी होतो आणि उत्पादनात 5 ते 10 टक्के वाढ होते.
▪️ प्रजननासंबंधी समस्या कमी होतात.
▪️ खुरांची योग्य निगा राखल्याने जनावरे लंगडत नाहीत.
▪️ जनावरांची झपाट्याने वाढ होते व उत्पादन वाढते.

हेही वाचा : मोदी सरकारने कृषी बजेट वाढवले, आता 6.22 लाख कोटी रुपयांची तरतूद

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews