Take a fresh look at your lifestyle.

Samrddhi mahamarga : समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाच्या अवघ्या पाच दिवसांतच झाले एवढे अपघात..!!

0

मोठ्या जल्लोषात आणि वाजत-गाजत पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे(sumrudhi mahamarga) मोठ्या जल्लोषात लोकार्पण करण्यात आले. परंतु लोकार्पणाला जेमतेम पाच दिवस उलटून गेले नाहीत तर या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे.

विदर्भ आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात समृद्धी येईल, असं म्हंटलं जात होतं. परंतु या महामार्गावर फक्त एकट्या बुलढाणा (Buldhana) जिल्यातील 5 अपघात झाले आहेत. सुदैवानं या अपघातात आज पर्यंत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी देखील होणारे हे अपघात मात्र चिंतेची बाब असल्याचं समोर आले आहे.

कधी आणि कसे झाले अपघात?

▪️ 12 डिसेंबर : एक मालवाहू ट्रक अनियंत्रित होऊन मेहकरजवळ महामार्गावरील कठड्यावर आदळून पलटी झाला, या मालवाहू ट्रकचा चालक जखमी झाला आहे.
▪️ 12 डिसेंबर : एक गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन महामार्गाच्या खाली 20 फूट खोल खड्ड्यात पालटला, चालक आणि वाहक जखमी.
▪️ 15 डिसेंबर : रात्री एक कार शिर्डीहून अमरावती कडे जात असताना चालकाला झोप लागल्याने कठड्याला धडकून अपघात, या अपघातात 11 महिन्याच्या बाळांसह तिघे जण गंभीर जखमी.
▪️ 16 डिसेंबर : एक कार औरंगाबादहुन मेहकरकडे जाताना रस्त्यावर अचानक कोल्हा आला आणि कार अनियंत्रित होऊन अपघात झाला, दोन गंभीर जखमी, एकजण किरकोळ जखमी.
▪️ 16 डिसेंबर : मुंबईहून एक कार वर्धा कडे जाताना मेहकर नजीक चालकाला झोप आल्याने कार कठड्याला धडकून अपघात, चालक गंभीर जखमी.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues