Take a fresh look at your lifestyle.

तूर लागवड प्रक्रीया अन् फायदे सर्व काही जाणून घ्या…!

0

तुरीच्या उत्पादनात महाराष्ट्राची भूमिका महत्वाची आहे. या उत्पादनातून आर्थिक फायदा होतोच. शिवाय विविध अंगाने तूर डाळीचे वेगळेच महत्व आहे. आज तूर लागवड प्रक्रीया, जमीन, मशागत कशी करावी? तसेच इतर अनेक महत्वपूर्ण बाबींबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

जमीन कशी असावी? : यासाठी दर्जेदार शेतजमिन लागते. पाण्याची उपलब्धता उथळ शेतजमीन ही या पिकासाठी सुपीक मानली जाते. साधारणत: 6 ते 7 एकरामध्ये हे पीक घेतले जाते.

पेरणीपूर्व मशागत : रब्बी हंगाम संपला कि, खरीपातील या पीकासाठी जमिनीची मशागत महत्वाची असते. नांगरण, कोळपनी यामुळे शेतजमीन भुसभुशीत होते. शिवाय आर्द्रताही वाढते. अशा प्रकारे मशागत केल्यावर पीक तर बहरात येते आणि उत्पादन वाढीसही फायदा होतो.

पेरणीची पद्धत कशी असते? : तुरीची आंतरपीक म्हणून पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये तूर + बाजरी (१: २) तूर + सूर्यफूल (१: २), तूर + सोयबीन (१: ३ किंवा १) तूर + ज्वारी (१: २ किंवा १: ४), तूर + कापूस, तूर + भुईमूग, तूर+मूग, तूर+उडीद (१:३) याप्रमाणे पेरणी केली जाते. यामुळे दोन्ही पिकांचे उत्पन्न चांगले होते. दरम्यान योग्य वेळी छाटणी, मशागत केली तर उत्पादनातही चांगली वाढ होते.

खत आणि पाण्याचे व्यवस्थापन कसे करायचे? : तूर हे आंतरपिक म्हणून घेतले जाते. सोयाबीन, उडीदमध्ये याची पेरणी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूरीचे उत्पादन किती घ्यावयाचे आहे? त्यानुसार पेरणी करणे आवश्यक आहे. विशेषतः खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या काळात पाणी देण्याची गरज भासत नाही. मात्र पाण्याची कमतरती भासल्यास सिंचनाची सुविधा करावी लागते. पेरणीपासून ३० ते ४० दिवसानंतर हे पिक चांगले येते. पुढे ६० ते ७० दिवसांनी तूरीला फुले लागतात. त्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेत पीक येते. जर शेंगा भरण्याच्या दरम्यान पाणी दिले गेले तर उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

काढणी आणि साठवणूक : तुरीच्या शेंगा वाळल्या की, तूर काढणी योग्य झाली असे समजले जाते. तूर कापून काढली जाते. तूरीच्या शेंगा मशनरी किंवा बडवून वेगळ्या केल्या जातात. साठवून ठेवण्यापूर्वी चांगले ऊल देणे गरजेचे असते. त्यानंतर पोत्यामध्ये साठवून ठेवा. या साठवलेल्या पोत्यामध्ये कडूलिंबाची पाने टाकल्याने कीटकांपासून धान्याचे संरक्षण होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues