Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकींग : पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

0

महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतांना आता इच्छुक उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीबाबत मुदत वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले :

पोलीस भरतीच्या संदर्भात आतापर्यंत आमच्याकडे 11 लाख 80 हजार अर्ज आलेले असून तथापि काही ठिकाणांहून ही तक्रार येते आहे की, तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची तारीख आम्ही 15 दिवसांनी वाढवतो आहे. 15 दिवस अधिकचे आम्ही देत आहोत, त्यामुळे उर्वरीत ज्या तक्रारी आहेत, त्याही दूर होतील.

एवढेच नव्हे तर नॉन क्रिमिलीयरच्या संदर्भातही काही तक्रारी आल्या होत्या. मागील वर्षीचं नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र यावर्षी मिळतं. त्यामुळे मागील वर्षीचं त्यांनी यावर्षी घेतल्यावर ते ग्राह्य धरलं जाणार आहे. ही अडचणही दूर करण्यात आलेली असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगतील आहे.

दरम्यान, अर्ज भरताना उमेदवारांना अडचणी येत असल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या संपूर्ण राज्यभरातून मुदतवाढीची मागणी करण्यात येत होती. त्याला राज्य सरकारनं सकारात्मक प्रतिसाद देत 15 दिवसाची मुदतवाढ केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues