Take a fresh look at your lifestyle.

जाणून घ्या महाराष्ट्राबाहेरील केळीच्या जाती

0

क्षेत्राच्‍या व उत्‍पन्‍नाच्‍या दृष्‍टीने आंब्‍याच्‍या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्‍या उत्‍पन्‍नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे दोन लाख वीस हजार हेक्‍टर क्षेत्र केळीच्‍या लागवडीखाली आहे.

केळी उत्‍पादन करणा-या प्रांतात क्षेत्राच्‍या दृष्‍टीने महाराष्‍ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. दरम्यान आज आपण महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या केळीच्या जातीची माहिती पाहू…

1) चक्रकेळी : दक्षिण भारतातील आंध्र राज्यातील गोदावरी जिल्ह्यात ही जात लावतात. झाड आठ फुटापर्यंत उंच वाढते. फळाचा आकार मोठा असतो. गर गोड व मधुर असतो.

2) कुन्नन : केरळ राज्यातील ही जात उंचीने मध्यम असते. केळीची साल पातळ असून गर चवदार असतो. या जातीचे फळ सुपारीच्या आकारासारखे असते. पिकण्यापुर्वी, वाळवलेल्या केळ्यांचा गर लहान मुलांना अन्न म्हणून देतात.

3) अमृतसागर : पश्चिम बंगालमध्ये ह्या जातीची लागवड करण्यात येते. या जातीची गुणवत्ता उत्कृष्ट असली तरी घडाचे वजन कमी व झाड नाजूक असल्यामुळे याची लागवड मोठ्या प्रमाणात तिकडे कुणी करीत नाही. फळाचा आकार मध्यम, साल मध्यम जाड, गर चवदार व पिठूळ असतो.

4) बोंथा : ही आंध्र प्रदेशातील केळीची जात अवर्षण परिस्थितीला तोंड देणारी आहे. दक्षिण भारतात परसदारी (घराशेजारी) या जातीची लागवड मोठ्ये प्रमाणात करतात. झाड उंच व खोड फिकट हिरव्या रंगाचे असते. घडाचे सरासरी वजन 10 ते 15 किलो भरते. प्रत्येक घडता फळांची संख्या 60 पर्यंत असते. फळाची साल जाड व हिरवी असते. दक्षिणेत लग्नसमारंभ शोभेकरता या घडाचा वापर करतात. म्हणून आंध्रच्या काही भागात या जातीला ‘कल्याणवझाई ‘ म्हणून संबोधतात. कच्च्या फळांचे काप करून तळून खातात.

5) जायंट गव्हर्नर : ही जात बसराईचाच उपप्रकार आहे. पश्चिम बंगालमध्ये अगदी अलीकडेच लोकप्रिय व्हायला लागली आहे. झाड मध्यम उंचीचे, केळीचा आकार मोठा, केळीच्या सालीचा रंग हिरवा व पिवळसर, गर घट्ट व गोड असतो. घडाचे सरासरी वजन 15 किलोपर्यंत असते. ही जात पानांच्या करपा रोगाला बळी पडणारी आहे.

6) विरूपाक्षी : ही एक डोंगरी केळीची जात आहे. ही जात तामिळनाडू राज्यातील 300 -400 फूट उंचीवरच्या पलानी टेकड्यांच्या भागात कायमस्वरूपी लागवडी (Pereninal) खाली आहे. या केळीची चव व टिकाऊपणामुळे ती तिकडे लोकप्रिय आहे. आंध्रराज्यातील देवळांतील पंचामृताकरता ही जात वापरतात. सपाट, मैदानी भागात हिची लागवड यशस्वी होत नाही. या जातीवर पर्णगुच्छ रोगाचा जास्त प्रादुर्भाव होती.

माती चाचणी : माती परीक्षण करणे आवश्यक का आहे? जाणून घ्या प्रक्रिया

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues