Take a fresh look at your lifestyle.

Police Bharti : काय सांगताय राव!! राज्यात पोलिस भरतीसाठी चक्क उच्चशिक्षित तरुणांनी केले अर्ज; बातमी वाचून तुम्ही होताल थक्क

0

राज्यभरात सर्वत्र पोलीस भरतीची तयारी अगदी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. महाराष्ट्रात यंदा होणाऱ्या पोलीस भरतीसाठी 18 लाख हुन अधिक अर्ज आले आहे. राज्यातील विविध ठिकाणी विविध तारखेला भरती प्रक्रिया राबवण्यात आले आहे. संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातून देखील भरती मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परंतु काल झालेल्या भरती बाबत संभाजीनगर (औरंगाबाद) मधून एक धक्कादायक माहिती समोर आलं आहे..

नेमके प्रकरण काय?

संभाजीनगर (औरंगाबाद) ग्रामीण पोलीस दलात एकूण 39 जागा भरल्या जाणार असून, यासाठी 5 हजार 725 अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे यांत बीएचएमएस -एमडी, एमई, बीई, एलएल. एम.,एलएल. बी.,एमबीए, एमएस्सी, फार्मा पदवीधरकांसह तब्बल 1 हजार 661 उच्चशिक्षित तरुणांनी पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहे.

हि भरती सध्या पोलिस मुख्यालयाच्या गोकुळ क्रीडा मैदानावर भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये 39 पदांसाठी होणारी भरती मध्ये साधारण महिलांची 12 पदे आहेत. तर उर्वरित पदे हे पुरुषांसाठी ठेवण्यात आले आहे. या 39 पदांसाठी 4 हजार 225 पुरुषांचे, तर 1 हजार 500 अर्ज महिलांचे आले आहेत.

दरम्यान, औरंगाबादच्या पोलीस भरतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या या तरुणांची शिक्षण पात्रता पाहिल्यास राज्यात बेरोजगारीचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे स्पष्ट होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues