Take a fresh look at your lifestyle.

Job Update : दहावी पास असणाऱ्या तरुणांना नोकरीचा गोल्डन चान्स, या 5 नामांकित कंपन्यांमध्ये होणार मेगा भरती

0

Job Update : सध्या देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यातील अनेक उच्च शिक्षित तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. आता बीडमध्ये तरुणांना रोजगाराची संधी मिळणार असून 4 मार्च रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा होत आहे. या अंतर्गत 143 पदांसाठी भरती होणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्या पदासाठी होणार भरती?

  1. टॅलेनसेतु सर्व्हिस प्रा.लिमिटेड : येथे मशिन ऑपरेटर या पदाची भरती होणार आहे. एकूण पदे 20, शैक्षणिक पात्रता- बारावी,डिप्लोमा इन इंजिनिअरिंग वयोमर्यादा – 18 ते 25, जॉब लोकेशन पुणे.
  2. असेंब्ली लाईन : येथे ऑपरेटर या पदाची भरती होणार आहे. एकूण पदे 20, शैक्षणिक पात्रता- बारावी, वयोमर्यादा – 18 ते 25, जॉब लोकेशन पुणे.
  3. महिंद्रा स्टील सर्व्हिस सेंटर लि. : येथे ॲप्रन्टाइस ट्रेनी या पदाची भरती होणार आहे. एकूण पदे 50, शैक्षणिक पात्रता- दहावी वयोमर्यादा 18 ते 30, जॉब लोकेशन पुणे.
  4. स्पॉटलाईट कन्संलटंसी : येथे सी.एन.सी.मशिन/फिल्ड सेल्स एक्जुकेटिव्ह या पदाची भरती होणार आहे. एकूण पदे 50, शैक्षणिक पात्रता- बारावी, वयोमर्यादा – 18 ते 35, जॉब लोकेशन पुणे.
  5. बेगन पेस्ट कंट्रोल : येथे टेक्नीकल ऑपरेटर या पदाची भरती होणार आहे. एकूण पदे 03, शैक्षणिक पात्रता- बारावी, वयोमर्यादा – 18 ते 40, जॉब लोकेशन सांगली/कोल्हापूर

दरम्यान, सरकारच्या या रोजगार मेळावामध्ये सहभागी होण्यासाठी आजच या संकेतस्थळावर भेट द्या https://rojgar.mahaswayam.gov.in/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues