Take a fresh look at your lifestyle.

Bank Update : बँकांच्या वेळात होणार मोठे बदल!! काय असणार नव्या वेळा जाणून घ्या सविस्तर

0

Bank Update : बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित असलेली मागणी आता पूर्ण होणार आहे. बँकिंग कर्मचाऱ्यांसाठी लवकरच फाइव्ह डे वीक सुव‍िधा लागू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज यांच्यात सहमती झाली असून प्रत्येक महिन्यातील दोन सुट्ट्या वाढल्याने बँक कर्मचाऱ्यांचा कामाचा वेळ वाढवला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगतले आहे.

दरम्यान, मात्र महिन्यात दोन सुट्ट्या वाढवल्याने बँक कर्मचाऱ्यांना रोज 40 मिनिटे अधिक काम करावे लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. तसचे रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. मात्र आता येत्या काळात प्रत्येक शनिवार आणि रविवारी बँका बंद राहणार आहेत. लवकरच हा नवीन लागू होणार आहे. कर्मचाऱ्यांची ऑफिस वेळ सकाळी 9.45 वाजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असणार आहे. हा प्रस्ताव आयबीएने मान्य केल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues