How to close demat account : नको असणारे डिमॅट खाते कसे बंद करावे? किती चार्ज लागतो? जाणून घ्या….
आपल्या पैकी अनेकांना माहिती आहे कि.. डिमॅट खाते मेंटेन करण्याचा दरवर्षाला चार्ज द्यावा लागतो. त्यामुळे तुमचे डिमॅट अकॉऊंट ऍक्टिवेट असेल तर, तुम्ही त्याला बंद करू शकता. जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. अनेक लोकांना याबाबत माहिती नसते की डिमॅट अकॉऊंट बंद करायचे कसे? पुढे दिलेल्या टिप्स वापरून सोप्या पद्धतीने तुम्ही डिमॅट अकॉऊंट बंद करू शकता.
डिमॅट अकॉऊंट बंद कसे करावे? (How to close demat account)
सर्वात आधी ऑनलाईन पद्धतीने अकॉऊंट क्लोजर फॉर्म डाऊनलोड करा.
त्या फॉर्मला पूर्ण भरा.
त्यानंतर डिपॉजिटरी पार्टिसिपेंट अधिकारी समोर या फॉर्मवर सही करा.
बंद करताना या कागदपत्रांची गरज
तुमचे आयडी किंवा डिपी आयडी, केवायसी डिटेल्स, नाव आणि पत्त्याची माहिती डिमॅट अकॉऊंट बंद करण्याचे कारण बँक अधिकाऱ्यातर्फे वेरिफाइड आयडी