Take a fresh look at your lifestyle.

Oscar 2023 : भारताने रचला इतिहास! ‘या’ बहुचर्चित गाण्याला मिळाला सर्वात मोठा ऑस्कर पुरस्कार

0

यंदाचा ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळा हा भारतीयांसाठी खास ठरला आहे. कारण यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात अनेक भारतीय चित्रपटांनी व गाण्यांनी बाजी मारली आहे. 2023 या वर्षातील हा पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस अँजेलीस येथील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला असून यंदाच्या ऑस्करमध्ये भारताच्या ‘द एलिफेंट विस्परर्स’ याा लघुपटाने देखील बाजी मारली असून देशाची शान उंचावली आहे.

एवढेच नव्हे तर ओरिजनल साँगसाठीचा ऑस्कर एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर सिनेमाला मिळाला. RRR च्या नाटू नाटू या गाण्याने बेस्ट ओरिजनल साँगचा ऑस्कर पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. संगीतकार एमएम किरावानी यांनी आपल्या भाषणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. या गाण्याचे नाव ऐकताच संपूर्ण डॉल्बी थिएटर आनंदाने उसळले होते.

दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यात तीन भारतीय चित्रपट स्पर्धक म्हणून रिंगणात उतरले आहेत. यापैकी आरआरआरच्या नाटू-नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात नामांकन मिळाले आहे. ऑल दॅट ब्रीद्स हा सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर विभागात आहे, तर द एलिफंट व्हिस्पर्स सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटाच्या विभागात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues