Take a fresh look at your lifestyle.

Krushidoot : कशी होते जनावरांना जंताची बाधा?

0

जनावरांना विशेषतः वासरांमध्ये जंत प्रादुर्भाव (Deworming) जास्त प्रमाणात होताना दिसतो. जंत हे परजीवी असतात. परजीवी (paarasites)स्वतःच्या पोषणासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. म्हणजेच जंत (worms) जनावरांच्या शरीरातील पोषण मूल्याचे शोषण करत असतात.

बकरी पालन करण्यासाठी ‘या’ पद्धतीने मिळवा ताबडतोब लो

जंताची प्रसार :

  • जंताने बाधित जनावरांच्या शेणातून हे जंत जमिनीवर येत असतात.
  • निरोगी जनावरे अशा ठिकाणी चरण्यासाठी गेल्यास हे जंत त्यांच्या शरीरात प्रवेश करतात.
  • जंतानी शरीरात प्रवेश केल्यानंतर, जंत आतड्यामध्ये जाऊन बसतात.
  • काही वेळेस जंत शेणाच्या माध्यमातून जमिनीवर पडल्यावर या ठिकाणी त्यांना पोषक वातावरण मिळाल्यास शेजारील गवतावर, गवताच्या पात्यावर जाऊन बसतात.
  • जनावरांना चरायला सोडल्यावर त्यांनी हे गवत खाल्यानंतर त्यांना जंताची बाधा होत असते.
  • पोषक वातावरण नसल्यास हे जंत, स्वतःभोवती पोषक वातावरण तयार करून तीन महिन्यापर्यंत जिवंत राहू शकतात.

हे जंत जनावरांच्या पोटातील पाचक स्त्राव, रक्त, अन्न यांसारख्या गोष्टींवर जगत असतात. यामुळे जनावरांचे शेण पातळ पडायला सुरुवात होते. जनावरांची त्वचा कृश,जाड झालेली दिसून येते. कातडीची चमक नाहीशी होते. मेंढ्यामध्ये लोकरीची प्रत खालावते. दूध उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतो.

जंतनिर्मूलनाची विविध औषधे बाजारात उपलब्ध आहेत. नवजात वासरांमध्ये दहाव्या दिवशी जंताचा पहिला डोस दिला पाहिजे. पुढे सहा महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याला जंताचे औषध वासरांना दिल पाहिजे. मोठ्या जनावरांना प्रत्येकी तीन महिन्यानंतर जंताचे औषध द्यावे. जनावरांच्या शेणाची तपासणी करून प्रभावी जंतनिर्मुलन होतय कि नाही ते देखील तपासणे तेवढे महत्त्वाचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues