बकरी पालन करण्यासाठी ‘या’ पद्धतीने मिळवा ताबडतोब लोन
शेती क्षेत्राला देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून संबोधले जाते तर पशुपालन क्षत्राला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखले जाते. अल्पभूधारक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून बकरी पालन अथवा शेळीपालन मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. मात्र असे असले तरी अनेक अल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांकडे शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्याप्त इन्व्हेस्टमेंट उपलब्ध नसते. त्यामुळे इच्छा असूनदेखील शेळीपालन व्यवसाय सुरु करता येत नाही.
जर आपल्याकडे शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसेल तर आजची बातमी विशेष आपल्यासाठी. आम्ही आज शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसा कसा उभारायचा अथवा शेळी पालन करण्यासाठी कुठून लोन प्राप्त करायचे याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. अनेक शेतकरी बांधवांना शेळी पालन करण्यासाठी देखील लोनची सुविधा उपलब्ध असते याबाबत माहिती नसते, त्यामुळे अनेक शेतकरी हा व्यवसाय सुरू करू शकत नाहीत.
शेळी पालन करण्यासाठी लोन :
अल्प भूधारक तसेच भूमिहीन शेतकरी जर शेळी पालन करू इच्छित असेल पण त्यांच्याकडे या व्यवसायासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध नसेल तर असे इच्छुक शेतकरी लोन घेऊन हा व्यवसाय सुरु करु शकतात. शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी जर आपण 20 बकऱ्या विकत घेऊ इच्छित असाल, तर यासाठी आपणास कर्जाची सुविधा उपलब्ध होते तसेच सरकारकडून अनुदान देखील मिळू शकते. मात्र असे असले तरी या व्यवसायासाठी लोन प्राप्त करण्यासाठी टेक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो, तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये शेळीपालन कोणत्या जागी केले जाणार आहे यासंदर्भात योग्य माहिती भरावी लागते.
शेळीपालन स्वतःच्या शेतीत किंवा जागेत करणार आहेत की जागा भाड्याची आहे यासंदर्भात देखील सदर प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये माहिती भरावी लागते. याशिवाय शेळीपालन सुरू करण्यासाठी किती जागेचा वापर केला जाणार आहेतसेच या व्यवसायासाठी किती भांडवल अपेक्षित आहे या संदर्भात सर्व तपशील सदर प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये असणे अनिवार्य आहे.
बकरी पालन करण्यासाठी कुठून प्राप्त करणार लोन :
जर आपणासही बकरी पालन सुरु करायचे असेल तर आपणास हा व्यवसाय सुरू करण्यासाठी नाबार्ड तर्फे लोन पुरविले जाते. तसेच या व्यवसायासाठी मिळणार्या लोनची विशेषता म्हणजे आपण या कर्जाची परतफेड तब्बल पंधरा वर्षापर्यंत करू शकता.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी नाबार्ड तर्फे जवळपास 15 लाख रुपयांचे कर्ज भेटू शकते. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता शिवाय आपण राज्याच्या पशुपालन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन देखील या संदर्भात अधिक माहिती प्राप्त करू शकता.