Take a fresh look at your lifestyle.

Google Search Tips : गुगलला सर्च करताय? गुगलवर सर्च करण्याच्या या टेक्निक फॉलो करा!

0

सर्च करायचं म्हटलं की, प्रथम आठवतं ते म्हणजे गुगल. विषय कोणताही असो एकच समाधान अशी गुगलची ओळख बनलीय. मात्र कधी-कधी आपल्याला हवी असलेली सगळी माहिती एकत्र, एकाच वेबसाईट मिळत नाही. नेमकी जी माहिती हवी असते तीच मिळत नाही. असं का? याचं कारण म्हणजे गुगलवर सर्च करण्याची सुद्धा एक टेक्निक आहे. आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत!

कधी-कधी माहिती शोधताना आपण नेमकं काय सर्च केलं पाहिजे, हेच आपल्याला माहित नसते. अशावेळी सर्चसंबंधी आठवत असलेले दोन किंवा अधिक शब्द सर्च बॉक्समध्ये टाकून दोन्ही शब्दांच्या मध्ये ‘or’ किंवा दोन्ही शब्दांना “।’’ सिम्बॉलने वेगळं करायचं. यानंतर गुगल आपल्याला आपल्या दोन्ही पर्यायांविषयी माहिती देतं.

माहिती शोधताना काहीवेळा आपल्याला ठराविक विषयावरची वेबसाईट हवी असते, पण ती कशी शोधावी हेच कळत नसते. अशावेळी दोन समानार्थी शब्दांच्या मध्ये ” ~ ” सिम्बॉल टाकून सर्च केल्यास आपल्याला पाहिजे त्या विषयाची वेबसाईट आपल्यासमोर येते.

ठराविक वेबसाईटची माहिती शोधण्याची सोप्पी पद्धत म्हणजे, आपण ज्या वेबसाईटवर माहिती वाचली होती त्या वेबसाईटची URL लिहून त्यापुढे त्या माहितीशी निगडीत शब्द टाकल्यास ती माहिती थेट त्या वेबसाईटवर सर्च होते. या टेक्निकमुळे आपल्याला सरळ हवी ती गोष्ट मिळवता येते.

समजा आपल्याला एक वाक्य सर्च करायचं आहे पण त्या वाक्यातला एखादा शब्द आठवत नाही. मग अशावेळी काय करायचं? तर त्या माहित नसलेल्या शब्दाच्या जागी ‘*’ स्टार लिहून सर्च करायचं. यानंतर गुगल आपल्यासमोर योग्य ते पर्याय ठेवते.

काहीवेळा जी माहिती शोधायची असते. त्यासंदर्भात आपल्याला खूप अस्पष्ट आठवत असतं किंवा सुरुवातीचं आणि शेवटचेच शब्द फक्त आठवत असतात. पण मधले शब्द आपण विसरलेलो असतो. अशावेळी सुरुवातीचा शब्द आणि शेवटचा शब्द लिहून मधोमध AROUND + (मधल्या शब्दांची संख्या) लिहून सर्च केल्यास गुगल अपोआप गाळलेल्या जागा भरून तुमची माहिती समोर ठेवतं.

एखाद्या विशिष्ट काळात घडलेली घटना किंवा त्यादरम्यानची विशिष्ट माहिती मिळवायची असल्यास सोप्पी पद्धत म्हणजे दोन शब्दांच्यामध्ये तीन टिंब द्यायचे. म्हणजे समजा आपल्याला 1947 ते 2017 पर्यंत झालेल्या भारताच्या राष्ट्रपतींची माहिती काढायची असल्यास सर्च बॉक्समध्ये presidents of india 1947…2017 असं लिहावं लागेल.

ठराविक शब्दाचं शीर्षक असलेला माहिती शोधायची असल्यास intitle: लिहून त्यापुढे तो ठराविक शब्द लिहून सर्च केल्यास गुगल आपल्या समोर आपण लिहिलेला शब्द शीर्षक असलेली माहिती आपल्या समोर ठेवतं. याच प्रकारे inurl: लिहून वेबसाईटमधून आपण ठराविक माहिती मिळवू शकतो.

जर तुम्हाला दोन समान वेबसाईट शोधायच्या असतील तर सर्च बॉक्समध्ये ‘related:’ हा शब्द लिहून त्यापुढे आपल्याला ज्या वेबसाईट सारखी वेबसाईट शोधायची आहे तिचं नाव लिहावं लागेल. म्हणजेच related: krushidoot.com

गुगलवर अनेकदा आपल्याला हवी तीच माहिती आपल्याला मिळते असं होत नाही. त्यासाठी सर्च करताना लिहायच्या शब्दांना अवतरण चिन्ह दिल्यास फक्त आणि फक्त त्याच शब्दाशी जुळेल अशी माहिती समोर येते.

सर्च रिझल्टमधून नको असलेले पर्याय काढून टाकण्यासाठी पुढील पर्याय वापरा. समजा आपण सर्च करत आहोत New Smartphone पण आपल्याला फक्त त्यांची माहिती हवी आहे पण ती विकत घ्यायची नाहीत. अशावेळी वजा ’-’ चिन्ह लिहून त्यापुढे Buy हा शब्द लिहिल्यास रिझल्ट मधील पुस्तके विकत घेण्यासंबंधी सर्व माहिती वगळली जाईल.

Avatar 2 Box Office Collection : अवतार २ चित्रपटाने भारतात रचला इतिहास, ठरला हॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues