Take a fresh look at your lifestyle.

Avatar 2 box office collection : अवतार २ चित्रपटाने भारतात रचला इतिहास, ठरला हॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

0

avatar 2 box office collection : मेगाब्लॉकबस्टर हॉलिवूड चित्रपट ‘टायटॅनिक’ फेम दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनने अखेर ‘अवतार 2’ या जादुई चित्रपटात आपल्या करिष्माई कॅमेरा वर्कने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. कारण देशात आणि जगात ‘अवतार-2’च्या कमाईचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. हा चित्रपट 16 डिसेंबर (2022) रोजी प्रदर्शित झाला आणि अजूनही प्रेक्षकांना त्याच्या निळ्या दुनियेत घेऊन जात आहे.

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून जगभरात या सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून रेकॉर्ड करणाऱ्या या सिनेमाने आता आणखी एक रेकॉर्ड केला आहे. या सिनेमाने आता ‘टायटॅनिक’ (Titanic) या ब्लॉकबस्टर सिनेमाचादेखील रेकॉर्ड तोडला आहे.

काय केला रेकॉर्ड जाणून घ्या :
‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या सिनेमाने जगभरात 2.2448 बिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार, या सिनेमाने जगभरात 1,85,92,44,37,600 चा गल्ला जमवला आहे. आता या सिनेमाने ‘टायटॅनिक’ या ब्लॉकबस्टर सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. लियानार्डो डिकैप्रियो आणि कॅट विन्सलेट यांचा ‘टायटॅनिक’ हा सिनेमा 1997 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचं दिग्दर्शनदेखील जेम्स कॅमरॉनने (James Cameron) केलं होतं. या सिनेमाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues