Take a fresh look at your lifestyle.

Salary Hike : राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ

0

राज्यातील शिक्षकांसाठी एक आनंदाची आहे. 22 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यामुळे शिक्षकांच्या वेतनात वाढ होणार आहे.

राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या निर्णयाची अंमलबजावणी रखडली होती. या निवडणुका पार पडताच याविषयीचा शासननिर्णय जारी करण्यात आला असून 1 जानेवारी 2023 पासून शिक्षकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले.

दरम्यान वाढीव मानधनानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 16 हजार रूपये मानधन मिळणार आहे. तर माध्यमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 18 हजार रूपये तसेच उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना 20 हजार रूपये सुधारित मानधन देण्यात येणार आहे.

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्येदेखील वाढ करण्यात आली असून पूर्णवेळ ग्रंथपालांना 14 हजार रूपये तर पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांना 12 हजार रूपये, कनिष्ठ लिपिकास 10 हजार रूपये तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती यांना आठ हजार रूपये मानधन मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शिक्षकांचे सुधारित मानधन :
प्राथमिक, उच्च प्राथमिक : 16000 रु.
माध्यमिक : 18000 रु.
उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय : 20000 रु.
शिक्षकेतर कर्मचारी पूर्णवेळ मानधन : 14000 रु.
प्रयोगशाळा सहायक : 12000 रु.
कनिष्ठ लिपिक : 10000 रु.
चतुर्थ श्रेणी कर्मचारी : 8000 रु.

Adani Vs Hindenberg : अदानीच नाही, हिंडनबर्गने ‘या’ 16 कंपन्यांना देखील देशोधडीला लावले आहे, वाचा सविस्तर

Government Website Hack : गेल्या वर्षभरात जवळपास 50 सरकारी वेबसाइट झाल्या हॅक, 3 लाखांहून अधिक घोटाळे टळले

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues