Take a fresh look at your lifestyle.

शिवभक्तांसाठी खुशखबर, टोलमाफीची राज्य सरकारकडून घोषणा..

0

राज्य शासनाकडून शिवजयंती साजरी करण्यासाठी यंदा जोरदार तयारी सुरू आहे. यंदाही शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याची शक्यता असल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आता टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे ही टोलमाफी शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोलवर करण्यात आली आहे. ज्यामध्ये खालापूर, तळेगाव, खेड, राजगुरुनगर टोलनाक्यांचा समावेश असणार आहे. तसेच शिवनेरीवर 3 दिवस विविध बचतगटांची उत्पादने आणि खाद्यपदार्थांच्या 300 स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा :

18 फेब्रुवारी 2023 :
सायं. 6.30 वा. हिंदवी स्वराज्य महोत्सव 2023 उदघाटन.
सायं. 7 ते रात्री 10 वा. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ कार्यक्रम.

19 फेब्रुवारी 2023 :
स. 9 ते 11 वा. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा
दु. 3 ते 5 वा. शिववंदना
सायं. 6.15 ते 7 वा. महाआरती कार्यक्रम
सायं. 7 ते रात्री 10 वा. जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम

20 फेब्रुवारी 2023 : सायं.7 ते रात्री 10 वा. जाणता राजा कार्यक्रम

Shakuntala Railway Track : महाराष्ट्रातील ‘हा’ रेल्वे मार्ग आजही इंग्रजांच्या ताब्यात आहे… करोडोंची रॉयल्टी दरवर्षी भरावी लागते.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues