Take a fresh look at your lifestyle.

नोकियाचा भन्नाट 5G स्मार्टफोन भारतात लॉंच, वाचा खास फीचर्स..

0

नोकिया स्मार्टफोन्सचे उत्पादन करणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने आपला नवीन 5G स्मार्टफोन Nokia X30 भारतात लॉंच केला आहे. हा हँडसेट सप्टेंबरमध्ये जागतिक स्तरावर सादर केला होता तसेच कंपनीच्या म्हणण्यानुसार या स्मार्टफोनची फ्रेम 100% रिसायकल केलेल्या ॲल्युमिनियमची बनवलेली असून त्याचे मागील कव्हर 65% रियालकलींग केलेल्या प्लास्टिकने बनवलेले आहे.

Nokia X30 ची किंमत आणि फीचर्स :

Nokia X30 च्या 8 GB RAM + 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 48,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन क्लाउडी ब्लू आणि आइस व्हाइट कलर ऑप्शनसह येईल. कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर हँडसेटची प्री-बुकिंग सुरू झाली असून Nokia X30 5G ची विक्री 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

डिस्प्ले :
स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो फुल-एचडी+ रिझोल्यूशन ऑफर करतो. संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचा वापर करण्यात आला आहे.

चिपसेट :
वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, Nokia X30 5G मध्ये Adreno 619L GPU सह स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टा-कोअर प्रोसेसर आहे.

सॉफ्टवेअर :
स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टम आणि स्टॉक Android UI सह लॉंच केला आहे. फोनला 3 वर्षांसाठी 3 OS अपग्रेड आणि दर महिन्याला सिक्युरिटी अपडेट मिळत राहतील.

कॅमेरा :
फोनच्या मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 13MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी & कनेक्टिव्हिटी :
फोनमध्ये 4200 mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जला सपोर्ट करते. तसेच या फोनमध्ये 5G, Wi-Fi, GPS, NFC, ब्लूटूथ 5.1 आणि USB टाइप-सी पोर्टसह सुरक्षिततेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरदेखील असणार आहे.

एक भारतीय दर महिन्याला सुमारे 20 GB डेटा वापरतो; वाचा 5G मुळे काय बदल झाले?

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues