Ganesh Jayanti Special : आज गणेश जयंती – जाणून घ्या या दिवसाचे महत्व व शुभ मुहूर्त
बुद्धीची देवता असणाऱ्या गणपती अर्थात गणरायांचा वाढदिवस संपूर्ण जगात उत्साहात साजरा केला जातो. यंदा श्री गणेश जयंती (ganesh jayanti) 25 जानेवारी 2023 रोजी संपन्न होणार आहे. अनेक जण या दिवशी आपल्या घरात गणरायांची स्थापना करतात. गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. याला गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात.
दक्षिण भारतीय मान्यतेनुसार या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र गणेशाची पूजा केली जाते. गणेश जयंतीच्या दिवशी व्रत आणि पूजा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे बोलले जाते.
25 जानेवारी रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 11.29 ते दुपारी 12.34 पर्यंत शुभ मुहूर्त असेल. या शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा करू शकता.