Take a fresh look at your lifestyle.

Fixed Deposite Rates : आता ‘या’ बँकेने वाढवला FD व्याजदर; जाणून घ्या खातेदारांच्या काय होणार फायदा

0

FD interest rates : आता बंधन बँकेने त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. या बँकेने किती वाढ केली ते जाणून घ्या.

Bandhan Bank FD interest rates 2023 : तुम्हाला तुमचे कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवून चांगले व्याज मिळवायचे असेल, तर तुम्ही बँक एफडी योजनेत गुंतवणूक करू शकता. खाजगी क्षेत्रातील बंधन बँकेने त्यांच्या मुदत ठेवी म्हणजेच FD व्याजदरात (FD Rate Hike) 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेत किती वाढ झाली ते जाणून घ्या.

ज्येष्ठ नागरिकांना ८.५ टक्के व्याज मिळेल :
बंधन बँकेने सोमवारी सांगितले की, आता ज्येष्ठ नागरिकांना ८.५ टक्के व्याजाचा लाभ मिळणार असून सर्वसामान्य ग्राहकांना बँकेत मुदत ठेवींवर ८ टक्के व्याज मिळणार आहे. व्याजात वाढ केल्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांना ६०० दिवसांच्या मुदत ठेवींवर (एफडी) ८.५ टक्के आणि इतर नागरिकांना ८ टक्के वार्षिक दराने व्याज मिळेल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्याचप्रमाणे 1 वर्षाच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 7 टक्के करण्यात आला आहे. याचा अर्थ आता ज्येष्ठ नागरिकांना बंधन बँकेत ०.५ टक्के अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळणार आहे. बँकेने आजपासून हे नवे दर लागू केले आहेत.

आरबीआयने रेपो दरात वाढ केली होती
रेपो दर ठरवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे चलनविषयक धोरण समितीची बैठक आयोजित केली जाते. गेल्या वर्षी 2022 रोजी RBI ने रेपो दरात वाढ केली होती. याचाच परिणाम म्हणजे बँकांनी मुदत ठेवींचे दर वाढवले. यानंतर बँकांमध्ये गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे व्याजदरही वाढवण्यात आले.

या बँकांनी व्याजही वाढवले :
यापूर्वी IDFC FIRST बँकेने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले ​​होते. या बँकेत ज्येष्ठ नागरिकांना 18 महिने ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींवर 8% व्याज मिळत आहे. याच जन स्मॉल फायनान्स बँकेनेही त्यांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती. जनता बँक आता 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 8.10 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना या एफडीवर ८.८० टक्के व्याज मिळत आहे.

Bank Holidays : फेब्रुवारी महिन्यात इतक्या दिवस बँकांना राहणार कुलूप; लवकरात लवकर उरकून घ्या आपली कामे

Types Of Soil : शेतकऱ्यांनो ‘हे’ आहेत भारतातील मातीचे प्रकार; वाचा आपल्या शेतातील माती नेमकी कोणती ?

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues