Take a fresh look at your lifestyle.

Super Cow : दिवसाला 140 लिटर दूध देणारी ‘सुपर काऊ’; वाचा काय आहे प्रकरण

0

शास्त्रज्ञांनी सांगितले की चीनमधील प्रत्येक 10,000 गायींपैकी फक्त 5 गायी त्यांच्या आयुष्यात 100 टन दूध देऊ शकतात. म्हणूनच ते क्लोनिंगच्या माध्यमातून सुपर गाय बनवत आहेत.

China Super Cow : चीन प्राण्यांवर प्रयोग करत आहे. आता चिनी शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की त्यांनी क्लोनिंगद्वारे 3 ‘सुपर गायी’ तयार केल्या आहेत. ही ‘सुपर गाय’ एका दिवसात 140 लिटर दूध देऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

चीनच्या शास्त्रज्ञांनी असाही दावा केला आहे की त्यांच्याकडून तयार करण्यात येत असलेल्या गायीची (Super Cow) जात संपूर्ण आयुष्यात 100 टन म्हणजेच 2 लाख 83 हजार लिटर दूध देऊ शकेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनी शास्त्रज्ञांनी नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची ‘सुपर काउ’ प्रजनन केले. गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्याचा जन्म निंग्जिया भागात झाल्याचे सांगण्यात येत आहे. आणि, आता तेथील शास्त्रज्ञांचे लक्ष पुढील 2 वर्षात अशा 1000 गायींचे उत्पादन करण्यावर आहे.

चायनीज ‘सुपर काउ’बद्दलच्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले होते की, हे नेदरलँड्समधून आलेल्या होल्स्टेन फ्रिशियन गायीचे क्लोन आहेत. चीनने 2017 मध्ये क्लोनिंगद्वारे गायींची निर्मिती केली आहे. नुकतेच नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी नवीन प्रकारच्या गायींचे प्रजनन केले आहे.

UPI Lite : PhonePe आणि Paytm वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आता पासवर्डशिवाय करा ऑनलाइन पेमेंट!

चीनने केलीय आर्क्टिक लांडग्याचीही पैदास :
चीनने एका प्राण्याचे क्लोनिंग केल्यावर केवळ गायीचेच असे नाही, तर इतर प्राण्यांचे क्लोनही तेथे तयार केले जात आहेत. गेल्या वर्षी चिनी शास्त्रज्ञांनी जगातील पहिला क्लोन केलेला आर्क्टिक लांडगा तयार केला होता.

धोकादायक प्राणीही खातात चिनी :
चीन हा असा देश आहे, जिथे धोकादायक ते धोकादायक प्राणी खाल्ले जातात. होय, साप असो, वटवाघुळ असो, पॅंगोलिन असो की इतर प्राणी… त्यांची रेसिपी तिथे बनवली जाते. डुक्कर देखील त्यांचे आवडते खाद्य आहे. जेव्हा कोरोनाव्हायरस पसरला तेव्हा चीनमध्ये असे म्हटले गेले की तो काही सीफूडमुळे आला असावा, असे म्हंटले जाते.

Types Of Soil : शेतकऱ्यांनो ‘हे’ आहेत भारतातील मातीचे प्रकार; वाचा आपल्या शेतातील माती नेमकी कोणती ?

Adani Vs Hindenberg : अदानीच नाही, हिंडनबर्गने ‘या’ 16 कंपन्यांना देखील देशोधडीला लावले आहे, वाचा सविस्तर

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues