
government schemes : खुशखबर..!! सरकार शेतकऱ्यांना देणार 5 लाख रुपये, तुम्हाला करावे लागेल फक्त हे काम
शेतकरी आहात? आर्थिक अडचणी आहेत? मग हि बातमी तुमच्यासाठी दिलासादायक. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे कि नेहमीच राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे ‘कृषी ड्रोन अनुदान योजना’
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी 50 टक्के अनुदान देण्यात येत असून या योजनेतून शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान घेता येऊ शकते. ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांवरील विविध रोगांची तपासणी करता येणार आहे.
शेतकऱ्यांना नेमके किती अनुदान मिळणार ?
शेतकऱ्यांना या योजनेनुसार ड्रोनच्या रक्कमच्या साधारण 50 टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त 5 लाख अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा पदवीधर तरुण, अनूसूचित जाती-जमाती, अल्प आणि सीमांत शेतकरी त्यासोबतच महिलांसाठी आणि देशातील पूर्वोत्तरी राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना ड्रोनचा काय फायदा होणार?
ड्रॉनचा वापर पिकांची पाहणी करण्यासाठी तसेच पिकांवरील रोगांची तपासणी करण्यासाठी करता येतो. पिकांवर फवारणी करण्यासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त क्षेत्रावर ड्रॉनच्या मदतीने फवारणी करता येते. ड्रॉनला लावलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने पिकांवरील किड रोगांचे माहिती ठेवता येते.