Cotton Seed Variety : कापसाचे हे १० बियाणे (वाण) वापरा; मिळेल चांगले उत्पन्न
Cotton Seed Variety कापसाचे बंपर उत्पादन घ्यायचे असेल तर कापसाची सर्वोत्तम व्हरायटी निवड करणे खूप महत्वाचे आहे. शेतकरी दर वर्षी टॉप कापूस व्हरायटी शोधत असतो. कधी कधी एखादी नवीन व्हरायटी बाजारात येते आणि तिची शहा निशा न करता आपण ती पेरतो पण ती बोगस निघते आणि आपला वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे या लेखात आपण फक्त कुणाकडून ऐकून वाणाची निवड न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अनुभवातून जे कापसाचे वाण खरच चांगले आहे ते जाणून घेणार आहोत.
Cotton Seed Variety येत्या १ जून पासून बाजारात कापसाचे बियाणे विक्री साठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कापसाचे वाण निवड करण्या आधी शेतकऱ्यांनी काही गोष्टी बघणे महत्वाचे आहे. आपल्या जमिनीचा प्रकार कोणता आहे? जमीन हलकी आहे की भारी? आपल्या कडे पाण्याची व्यवस्था आहे का? हवामान कसे आहे? लागवड दाट करायची की मोकळी? इ. गोष्टींचा विचार करूनच कापूस व्हेरायटीची निवड करावी.
Cotton Seed Variety आपण कापसाच्या वानाबद्दल जाणून घेताना त्याचा कालावधी किती आहे? झाडाची वैशिष्ट्ये काय आहे? एका बोंडाचे वजन किती भरते? जमिनीचा प्रकार, सिंचन व्यवस्था, लागवडीचे अंतर इ. गोष्टी जाणून घेणार आहोत…
(1) राशी 659 (Cotton Seed Variety)
कालावधी : १६०-१७० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन : बागायत
उत्पादन : १०- १६ क्विंटल/ एकर
लागवड अंतर : ४×२, ५×१
बोंडाचे वजन : ६-७gm
इतर वैशिष्ट्ये : उशिरा येणारी व्हेरायटी,
रसशोषक किडींना सहनशील,
मोठे बोंड, जास्त उत्पादन
शेतकऱ्यांची सर्वात जास्त
पसंतीची.
(2) US Agriseeds US 7067 ( Cotton Seed Variety )
कालावधी : १५५-१६० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन : बागायत, कोरडवाहू
उत्पादन : ८- १६ क्विंटल/ एकर
लागवड अंतर : ४×१, ५×१
बोंडाचे वजन : ६-६.५ gm
इतर वैशिष्ट्ये : लवकर येणारी, दाट लागवडी
साठी सर्वोत्तम,
रसशोषक किडींना सहनशील,
मोठे बोंड, जास्त उत्पादन.
(3) राशी मॅजिक Cotton Seed Variety
कालावधी : १५०-१६० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन : बागायत
उत्पादन : ८- १६ क्विंटल/ एकर
लागवड अंतर : ४×१, ५×१
बोंडाचे वजन : ६-६.५ gm
इतर वैशिष्ट्ये : रसशोषक किडींना सहनशील,
मोठे बोंड, जास्त उत्पादन.
(4) Supercott (प्रभात) Cotton Seed Variety
कालावधी : १६०-१७० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन : बागायत, कोरडवाहू
उत्पादन : ८- १६ क्विंटल/ एकर
लागवड अंतर : ४×२, ५×१
बोंडाचे वजन : ६.५-६ gm
इतर वैशिष्ट्ये : रसशोषक किडींना सहनशील,
मोठे बोंड, जास्त उत्पादन,
शेंड्यावर जास्त बोंड.
(5) मोक्ष Cotton Seed Variety
कालावधी : १५५-१६० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन : बागायत, कोरडवाहू
उत्पादन : ८- १६ क्विंटल/ एकर
लागवड अंतर : ४×२, ५×१
बोंडाचे वजन : ६-६.५ gm
इतर वैशिष्ट्ये : रसशोषक किडींना सहनशील,
मोठे बोंड, बोंडाचे जास्त वजन,
वेचायला सोपी.
(6) मनी मेकर(कावेरी)
कालावधी : १५५-१६० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन : बागायत, कोरडवाहू
उत्पादन : ८- १६ क्विंटल/ एकर
लागवड अंतर : ४×२, ५×१
बोंडाचे वजन : ६-६.५ gm
इतर वैशिष्ट्ये : रसशोषक किडींना सहनशील,
मोठे बोंड, जास्त उत्पादन.
(7) धनदेव( महिको ) Cotton Seed Variety
कालावधी : १६०-१७०
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन : बागायत, कोरडवाहू
उत्पादन : ८-१४ क्विंटल/एकर
लागवड अंतर : ४×२, ५×२
बोंडाचे वजन : ६ gm
इतर वैशिष्ट्ये : जास्त फांद्या, डेरेदार झाड, मोठे
बोंड, लांब रेषा.
(8) अजित १९९ Cotton Seed Variety
कालावधी : १४५-१६० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन : बागायत
उत्पादन : ८-१६ क्विंटल/एकर
लागवड अंतर : ४×१.५, ५×१.५
बोंडाचे वजन : ६-६.५ gm
इतर वैशिष्ट्ये : रोग, रस शोषक किडींना
सहनशील, पाने लाल होत नाही,
वेचायला चिकट.
(9) GHH 029 (Bioseed) Cotton Seed Variety
कालावधी : १५०-१६० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन : कोरडवाहू, बागायत
उत्पादन : ८-१४ क्विंटल/एकर
लागवड अंतर : ४×१.५, ५×२
बोंडाचे वजन : ६.५-७ gm
इतर वैशिष्ट्ये : हे वाण किडींना मध्यम
मध्यम स्वरूपाचे सहनशील, हे
वाण फरदड घेण्यासाठी उत्तम
आहे.
राज्यात सर्वप्रथम बीटी कापूस लावणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा वाचाच!
(10) पंगा( तुलसी सीड्स ) Cotton Seed Variety
कालावधी : १५५-१६० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन : कोरडवाहू, बागायत
उत्पादन : ८-१४ क्विंटल/एकर
लागवड अंतर : ४×२, ५×२
बोंडाचे वजन : ६ gm
इतर वैशिष्ट्ये : हे वाण दाट लागवडीसाठी
उत्तम आहे, बोंडांचा आकार
मोठा, वेचणीला सोपा, भरगोस
उत्पादन
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup