Take a fresh look at your lifestyle.

Calcium For Crops : शेतकऱ्यांनो कॅल्शिअम वापरताय ? पण पिकांसाठी कॅल्शिअम महत्व आणि त्याचे पिकांच्या वाढीसाठीचे कार्य माहित आहे का ?

0

कॅल्शिअम हे नत्र, स्फुरद व पालाश अन्नद्रव्याप्रमाणेच पीक पोषणात महत्त्वाचे असे दुय्यम अन्नद्रव्य आहे. त्याच्या वापरासंदर्भात माहिती जाऊन घेणे आवश्‍यक असून, त्याचा डोळसपणे वापर केल्यास पीकपोषण चांगल्या प्रकारे होईल.

कॅल्शियम पिकांच्या महत्त्वाच्या शरीरक्रियांमध्ये महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. त्याचप्रमाणे नत्रयुक्त खतांचा (युरिया) कार्यक्षम वापर वाढवण्यासाठी विद्राव्य कॅल्शियममुळे मदत होते. त्यामुळेच खताद्वारे पिकांना कॅल्शियम देणे गरजेचे असते. (उदा. कॅल्शियम नायट्रेट) मात्र पिकांना कॅल्शियमचा पुरवठा हा कमतरतेची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून आल्यानंतर केला जातो.

कॅल्शियमची जमिनीतील उपलब्धता :
निसर्गात कॅल्शिअम सुमारे ३.६ टक्के असून, तो ॲम्फीबोल, ॲपेटाइट, कॅलसाइट, डोलोमाइट, फेल्डस्पार, जिप्सम आणि पायरॉक्सिन यासारख्या स्वरूपामध्ये आढळतो. जमिनीमध्ये चुना किंवा कॅल्शियम कार्बोनेट निसर्गतः आढळणारे संयुग आहे. जमिनीत कॅल्शियम साधे क्षार, विद्राव्य स्वरूपात व विनिमययुक्त कॅल्शियम इत्यादी स्वरूपात उपलब्ध असते.
जमिनीत कॅल्शियम (Ca++) हे रासायनिकदृष्ट्या धनप्रभारित असते. कॅल्शिअम मातीच्या व सेंद्रिय घटकांच्या कणांवर घट्ट चिकटून राहिल्यामुळे पाण्याद्वारे नत्राप्रमाणे कॅल्शियमचे वहन होत नाही.
कॅल्शियम जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म चांगले ठेवण्यास मदत करते. ज्या जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण मॅग्नेशिअम व सोडिअमपेक्षा जास्त असते, तिथे जमिनीची मशागत सोपी व सहज होते. कॅल्शियममुळे जमिनीची पाणीनिचरा क्षमता चांगली राहते. मुळांसाठी हवा खेळती राहते.
जमिनीचा सामू ७ ते ८.५ दरम्यान असल्यास कॅल्शियमची उपलब्धता जास्त असते, तर आम्लयुक्त जमिनीत (६ पेक्षा कमी सामू) कॅल्शियम कमी प्रमाणात असते.
आम्लधर्मी जमिनीप्रमाणेच चोपण जमिनीत सोडियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे पिकांना कॅल्शियमची उपलब्धता कमी होते. अशा जमिनीसाठी पिकांना कॅल्शियमयुक्त खताचा वापर फायदेशीर ठरतो.

कॅल्शियमचे पीकपोषणातील कार्य :
पिकांद्वारे कॅल्शियम Ca++ धनप्रभािरत कण या स्वरूपात शोषले जाते. पिकांमध्ये नत्राप्रमाणे कॅल्शियमचे वहन होत नाही. त्यामुळे पानांमध्ये एकदा कॅल्शियम साठून राहिला तर तो पिकांच्या इतर भागांना- विशेषतः वरच्या वाढ होणाऱ्या शेंड्यांना उपलब्ध होत नाही.
कॅल्शियमची वनस्पतीच्या शरीरांतर्गत कार्ये खालीलप्रमाणे आहेत…

१) पेशी मजबूत ठेवणे :
पेशी भित्तिका (सेल वॉल) मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम मदत करते. कॅल्शियममुळे पेशी भित्तिका मजबूत व जाड बनतात. पेशीमध्ये पेक्टिन व पॉलिसॅकराइड आधारक तयार होण्यासाठी कॅल्शियमची जरुरी असते. या घटकांमुळे पेशींना मजबुती येते. पिकांच्या पेशी, उती व अवयवांची लवकर वाढ व मजबुती कॅल्शियममुळेच मिळते.

२) फूल व फळधारणा :
पिकांमध्ये फूल, फळधारणाक्षमता वाढविण्यासाठी कॅल्शियम मदत करते.

३) पिकांची प्रत :
पिकांची प्रत उत्तम राहण्यास व उत्पादन अधिक काळ टिकून राहण्यास कॅल्शियम मदत करते.

४) उष्णतेपासून पिकांचे संरक्षण :
पिकांमध्ये सर्वांत महत्त्वाची वातावरणातील प्रकाश संश्‍लेशण क्रिया असते. वातावरणातील तापमान जर ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. अति उष्णतेमुळे झाडांचे खोड लांब होते, तर पानांचा आकार लहान होतो. या सर्व घटकांशी लढा देण्यासाठी पिकांना कॅल्शियम गरजेचे असते. कॅल्शियममुळे पिकामध्ये उष्माघातविरोधी प्रथिने तयार केली जातात.

५) रोगप्रतिकारक क्षमता :
कॅल्शियम पिकांमध्ये बुरशीजन्य व जिवाणुजन्य रोगाविरुद्ध रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. पिकांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास, बुरशींचा प्रादुर्भाव होऊन पाणीवहन करणाऱ्या नलिकेवर (xylem) विपरीत परिणाम होतो. पेशीभित्तिकांना पाणी व अन्नपुरवठा करणाऱ्या अवयवांची झीज होऊन मर रोगाची लक्षणे पिकांत दिसून येतात.
भुईमूग पिकाला कॅल्शियमची योग्य मात्रा दिली असता शेंगकूज रोग उद्‍भवत नाही. तसेच शेंगा चांगल्या भरल्या जातात.
कॅल्शियममुळे फळ पिके, भाजीपाला पिके यांचाही बुरशीजन्य व जिवाणुजन्य रोगांपासून बचाव होतो. पिथियम, रायझोक्टोनिया, फ्युजारियम, कोलोट्रोटिकम, बोट्राइटीस, ब्लाइट, स्लेटोटिनिया, हैलमिथेस्पारियम यासारख्या रोगापासून संरक्षण मिळण्यास मदत होते.

India Milk Production : दुग्धोत्पादनात भारतच नंबर 1; केंद्रीय दुग्धविकास मंत्र्यांची माहिती

६) अन्नद्रव्याचे शोषण :
अन्नद्रव्ये शोषण करणाऱ्या प्रथिनांच्या कार्यात कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे अन्नद्रव्यांचे मुळांद्वारा शोषण होऊन पिकांच्या प्रत्येक भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम अमोनियम नायट्रेट पाण्यात सहज विरघळत असल्याने पाण्याद्वारा व ठिबक सिंचनाद्वारा दिल्यास फायदा होतो.

७) भूसूधारक :
कॅल्शियमचा वापर भूसुधारकांमध्येही होतो. कॅल्शियमयुक्त खतांचा वापर जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी आणि मातीची जडणघडण चांगली राखण्यासाठी केला जातो.

IFFCO NANO Urea Export : आता NANO युरिया लिक्विड 25 देशांमध्ये होणार निर्यात; इफको वर्षअखेरीपर्यंत इतक्या कोटी बाटल्या तयार करणार

Kachiri Fish : 26 किलोच्या माशाने मच्छिमार बनवला लखपती!

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues