Take a fresh look at your lifestyle.

Breaking : उद्यापासून होणार ‘हे’ मोठे बदल; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार मोठा परिणाम

0

Breaking : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून काही नियम बदलले जातात त्याचा थेट परिणाम सर्व सामान्यांच्या खिशावर होतो. अशातच उद्यापासून म्हणजे मार्च महिन्यातही काही मोठे बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने 2000 रुपयांची नोट, एलपीजीची किंमत आणि ट्रेनच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल सोबतच सोशल मीडियामध्ये देखील बदल होणार आहेत.

2000 रुपयांची नोट : 1 मार्चपासून ग्राहकांना इंडियन बँकेच्या एटीएममधून 2000 रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. जर ग्राहकांना दोन हजार रुपयांच्या नोटा हव्या असतील तर बँकेच्या शाखेत जाऊन काढाव्या लागतील .

एलपीजीची गॅस : एलपीजी कंपनी दर महिन्याच्या सुरुवातीला तेल वितरण कंपन्यांमध्ये सुधारणा करत असते. मात्र गेल्या महिन्यापासून यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. सध्या 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईमध्ये 1052.50 रुपये आहे.

ट्रेनच्या वेळापत्रक : मार्चमध्ये होळीचा सण लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 1 मार्चपासून अनेक विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. या गाड्या दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबईसह अनेक मार्गादरम्यान धावतील.

सोशल मीडिया बदल : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी तीन तक्रार अपील समित्या स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर नियंत्रण राहणार आहे. हा नियम 1 मार्चपासून लागू होणार आहे. या समित्यांच्या माध्यमातून अवघ्या 30 दिवसांत वापरकर्त्यांच्या तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे. धार्मिक भावना भडकावणाऱ्या पोस्टवर नवा नियम लागू होणार आहे. ज्या अंतर्गत वापरकर्त्यांना दंडही होऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues