Take a fresh look at your lifestyle.

सध्या जनावरांना होतोय लंम्पी नावाचा आजार,जाणून घ्या कारण आणि उपाय?

0

शेतकरी वर्ग शेती बरोबर पशुपालन हा व्यवसाय करत असतो. सध्याच्या काळात जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा खूप महत्वाचे आहे. घाणीमुळे, साचलेल्या पाण्यामुळे विविध प्रकारचे रोग आणि आजार पसरत आहे, याचा धोका मनुष्य आणि जनावरांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.
गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी लंम्पी या आजारावर जास्त चर्चा होताना दिसत आहे. या आजारामध्ये गुरांच्या अंगावर तसेच संपूर्ण शरीरावर गाठी निर्माण होतात आणि त्यामुळं सर्वात मोठं नुकसान हे दुभत्या जनावराचे आहे. कारण जर हा आजार दुभत्या गाईला झाला तर दुधाचे उत्पादन हे कमी होते.
बऱ्याच गावात लंम्पी या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. हा एक संसर्गजन्य आजार आहे आणि हा आजार जलद गतीने कमी वेळात पसरत चालला आहे. हा आजार झाल्यावर त्वचेवर गाठी येत आहेत. त्यामुळं जनावरांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.


कशामुळे होतेय लंम्पी रोगाची लागण? :
जनावरांचा गोठा साफ किंवा स्वच्छ नसल्याने जनावरांच्या गोठ्यात गोचिड, माश्या, टिक्स होतात. यामुळेच जनावरांना लंम्पी आजाराची लागण होते. गोचिड किंवा चावणाऱ्या माशा यामुळे जनावरंच्या अंगावर गाठी किंवा मोठमोठे फोड येतात व त्यामध्ये पू सुद्धा होतो.


उपाययोजना :
जनावराच्या आरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.
जनावरांचा गोठा वेळोवेळी साफ करून त्यामधील गोचिड किंवा चावणाऱ्या माश्यांचा नायनाट करावा.
गोठ्यामध्ये तसेच आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राहील याची काळजी घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.