Take a fresh look at your lifestyle.

आपल्या जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात अन् ते कसे बघायचे?

0

शेत जमिन विकत घेण्यासाठी त्या भागातील जमिनीचे सरकारी दर काय आहेत? याची माहिती बऱ्याच जणांना नसते शिवाय त्याची आवश्यकता नाही असा अनेकांचा गैरसमज आहे. पण जर शासकिय दराची माहिती असली तर जमिनचा दर्जा, त्या परिसरातील भौगोलिक परस्थितीचा अंदाज बांधता येतो.

शेत जमिन असणे आजही प्रतिष्ठेचे मानले जात आहे. पण शेत जमिन विकत घेण्यासाठी त्या भागातील जमिनीचे सरकारी दर काय आहेत? (government rates) याची माहिती बऱ्याच जणांना नसते शिवाय त्याची आवश्यकता नाही, असे हि काहींचे मत आहे.परंतु जर शासकिय दराची माहिती असली तर जमिनचा दर्जा, त्या परिसरातील भौगोलिक परस्थितीचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे ज्या ठिकाणची (importance of land) जमिनीची खरेदी करायची आहे त्या भागातील सरकारी दर काय आहेत याची माहिती कशी मिळवायची याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

अशी आहे प्रक्रिया :

जमिनीचे सरकारी दर पाहण्यासाठी सर्व प्रथम Google वेबसाईटवर जाऊन तिथे असलेल्या सर्चबार मध्ये igrmaharashtra.gov.in असे टाईप करायचे आहे.

त्यानंतर मात्र, आपल्यासमोर महाराष्ट्र शासनाची नोंदणी आणि मुद्रांक विभागाची वेबसाईट सुरु होईल. या पेजच्या डाव्या कोपऱ्यात वेगवेगळे तीन मुद्द्यांचे टॅप दिसतील. यापैकी महत्त्वाचे दुवे असा लिहलेली टॅब दिसेल त्यावर क्लिक करा मग आपल्यासमोर बरेचशे पर्याय दिसतील. त्यापैकी मिळकत मूल्यांकन ह्या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर बाजारमुल्य दर पत्रक नावाचे पेज ओपन होईल. या पेजवर महाराष्ट्राचा नकाशा असणार आहे. त्यामध्ये आपल्याला ज्या जमिनीचा सरकारी भाव पाहयचा आहे. तो जिल्हा निवडा.

कोणत्या वर्षामध्ये किती भाव होता या पर्यावर क्लिक करुन आपल्याला कोणत्या वर्षात काय भाव होता याची देखील माहिती होणार आहे.

यानंतर आपल्याला ज्या भागात जमिन खरेदी करायची आहे. त्या गावचा जिल्हा, तालुका निवडायचा, त्यानंतर गाव निवडल्यानंतर आपल्याला त्या गावातील शेतजमिनीचे किंवा जागेचे भावही समोर येणार आहेत.

यामध्ये संबंधिताला जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीचा सरकारी भाव काय आहे याची माहिती समोर येईल.

यामध्ये जे भाव दिलेले असतात ते हेक्टरमध्ये असतात. त्यानुसार एकरी काय भाव आहे याचा अंदाज बांधता येणार आहे.

जमिनीनुसार ठरतात दर :

वरील प्रक्रियेत जमिनीचे सरकारी दर काय असतात याची तर माहिती मिळेलच. पण जिरायत जमिन, बागायती जमिन तसेच एमआयडीसी अंतर्गत येणारी जमिन, राष्ट्रीय महामार्गालगत येणारी जमिन त्यानुसार त्याचे दर हे ठरविण्यात येतात. यामुळे सध्याचे मुल्य आणि सरकारी दर काय याची माहिती झाली तर जमिनीचे नेमके भाव काय राहणार याचा अंदाज बांधता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues