Take a fresh look at your lifestyle.

२ एकरात गांजा लावण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याची अजब मागणी!

0

शेतकरी सध्या वाढती महागाई, नैसर्गिक आपत्ती अशा दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र आहे. अक्षरशः या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात गांजा उगवण्याची परवानगी मागितलीय.

सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून गांजा पिकवण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील अनिल आबाजी पाटील असे पत्र लिहीणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

शेतकऱ्याने आपल्या पात्रात म्हटले की, गांजाला चांगला भाव असल्याने मला माझ्या दोन एकर शेतीत गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी. जर १५ सप्टेंबरपर्यंत परवानगी न मिळाल्यास १६ तारखेला परवानगी मिळाली, असे गृहित धरून लागवड करणार आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यास आपले प्रशासन जबाबदार राहिल.

अनिल पाटील नावाच्या या शेतकऱ्याची शिरपूर ता. मोहोळ येथे स्वतःच्या मालकीची 2 एकर जमीन आहे. आपल्या 2 एकर क्षेत्रात गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. शासनाचा हमीभाव मिळत नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे असल्याचे कारण सांगत त्याने ही अजब मागणी केली आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues