Take a fresh look at your lifestyle.

भारीच! आता शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणार

1

शालेय अभ्यासक्रमात ‘कृषी’ विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा, असा निर्णय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले…
● सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग 0.93 टक्के असून तो तीन टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे.
● कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्यामुळे कृषी शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण होईल.
● त्याशिवाय शेतकऱ्यांविषयीची सामाजिक बांधिलकी निर्माण होईल.
● ग्रामीण भागात कृषी संशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळेल.
● विद्यार्थ्यांच्या वयानुसार कृषी क्षेत्राशी निगडीत संदर्भ त्यांना शिकविण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होईल.
● शेतकऱ्यांची नवी पिढी शास्त्रीय सचोटीने शेती व्यवसाय करू शकेल, पर्यायाने उत्पादनात वाढ होण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

शेतकरी आणि शेतीप्रती कृतज्ञतेची भावना : ‘कृषी’चा अभ्यासक्रमात समावेश करण्यामागे शेतकरी अणि शेतीप्रती कृतज्ञतेची भावना आहे. तसेच अभ्यासक्रमात शेतीशी संबंधित विविध विषयांचा समावेश होणे आवश्यक असल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले. शिक्षण व कृषी विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करण्याची कार्यवाही करणार असून विद्यार्थ्यांचे वय आणि त्याची बुद्धिमत्ता यांची सांगड घालून अभ्यासक्रम तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले कि, पर्यावरणाचा समतोल राखण्याची गांभीर्यता विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याबरोबरच जैव तंत्रज्ञानावर आधारित शेतीला चालना देण्याची गरज विद्यार्थ्यांमध्ये या शिक्षणामुळे निर्माण होईल.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

1 Comment
  1. जगदीश says

    कृषी अभ्यासक्रमामध्ये सेंद्रिय शेतीचे धडे दिले पाहिजे

Leave A Reply

Your email address will not be published.