Take a fresh look at your lifestyle.

Agricultural Technology Park : राज्यातील पहिले कृषी तंत्रज्ञान उद्यान ‘येथे’ उभारणार, शेतकऱ्यांना फायदा होणार…

0

Agricultural Technology Park : राज्यातील चंद्रपुरमध्ये कृषी तंत्रज्ञान उद्यान उभारण्यात येत आहे. हे शेतकऱ्यांसाठी स्थायी व कायमस्वरुपी केंद्र असेल. पंजाब नॅशनल बँकेशी संलग्न करत अजयपूर येथे जवळपास दहा एकर जागेवर कृषी केंद्र होत आहे. आतापर्यंत हे उद्यान हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये होते. चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित कृषी महोत्सवात राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहीती दिली आहे.

Agricultural Technology Park शेतकऱ्यांना शेतीसंबंधित वेळोवेळी नवीन माहिती कायम मिळत राहावी यासाठी राज्यातील एकमेव कृषी तंत्रज्ञान उद्यान चंद्रपुर जिल्ह्यात अजयपूर येथे उभारण्यात येणार आहे. अजयपूरमध्ये जवळपास 10 एकर जागेत हे उद्यान उभारण्यात येणार असल्याची त्यांनी माहीती दिली आहे.

Agricultural Technology Park याशिवाय आतापर्यंत देशात हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये अशा प्रकारची उद्यानं उभारण्यात येत होती आणि आता महाराष्ट्रात देखील असं उद्यान उभारणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. या उद्यानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती संबंधित नवनवीन आणि आधुनिक गोष्टींची माहिती स्थायी आणि कायमस्वरूपी असलेल्या या माध्यमातून मिळू शकणार आहे.

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, चार दिवसाच्या कृषी प्रदर्शनात अनेकदा शेतकरी उपस्थित न राहिल्यास त्यांना इतर वेळी चंद्रपूर जिल्ह्यात कायमस्वरूपी कृषी तंत्रज्ञान उद्यान सुरु केल्याने शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवून फायदा होणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. या नवीन कृषी तंत्रज्ञान उद्यानामध्ये नवीन तंत्रज्ञानासह, नवीन बियाणांच्या जाती, संपूर्ण कंपन्यांची माहिती देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितलं.

Agri Tech : तुम्हीही बनू शकता स्मार्ट शेतकरी, ‘या’ प्रगत तंत्रांनी शेतीमध्ये घडवा उज्ज्वल करिअर

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues