Take a fresh look at your lifestyle.

Actress’s Education : ‘हे’ आहे या बॉलीवूड अभिनेत्रींचे शिक्षण; जाणून घ्या तुमच्या आवडत्या अभिनेत्रीची शैक्षणिक पात्रता

0

बॉलीवूडमधील काही सुप्रसिद्ध अभिनेत्रींकडे कुठल्याही नामांकित विद्यापीठांच्या पदव्या नाहीत. तरीही त्या अभिनेत्री आज लाखो चाहत्यांच्या मनामध्ये घर करून राहतात. बॉलीवूडमधील काही अभिनेत्री अतिशय उच्चशिक्षित आहेत. जर त्या अभिनेत्री बनल्या नसत्या तर नक्कीच यशस्वी इंजिनियर किंवा अर्थशास्त्रज्ञ बनल्या असत्या. काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी अभिनयक्षेत्रात नाव कमविण्यासाठी आपले शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले नाही…

Anushka Sharma : अनुष्का शर्मा : हिने शालेय शिक्षण बेंगळूरूमधील आर्मी स्कूलमधून पूर्ण केले. तसेच बेंगळूरूमधील माउंट कार्मेल कॉलेजमधून तिने कला शाखेची पदवी घेतली.

Pariniti Chopra : परिणीती चोप्रा : हिने अर्थशास्त्र, फायनान्स आणि बिझनेस मॅनेजमेंट या तीनही विषयांमध्ये पदवी घेतली आहे. हे शिक्षण तिने इंग्लंडमधील मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून पूर्ण केले आहे. तिला इन्व्हेस्टमेंट बँकर व्हायचे होते.

Alia Bhat : आलिया भट : हिने जमनाबाई नरसी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच तिने ‘ स्टुडंट ऑफ द ईयर ‘ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

Vidya Balan : विद्या बालन : हिने मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र विषयामध्ये पदवी घेतली आहे. तिने समाजशास्त्र हाच विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले आहे.

Priti Zinta प्रीती झिंटा : हिने इंग्रजी साहित्य विषयामध्ये पदवी मिळविली असून तिने क्रिमिनल सायकॉलॉजी (गुन्हेगारांचे मानसशास्त्र) या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

Amisha Patel : अमिषा पटेल : बॉलीवूडमधील सर्वात उच्चशिक्षित अभिनेत्रींपैकी एक अमिषा आहे. तिने अमेरिकेतील विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयांमध्ये सुवर्ण पदक मिळवत पदवी मिळविली आहे. त्यानंतर तिने बायोजेनेटिक इंजिनियरिंग विषयामध्ये दोन वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर मॅसच्युसेट्स मधील टफट्स विद्यापीठातून तिने अर्थशास्त्राची पदवी घेतली.

Caterina Kaif : कॅटरीना कैफ : हिने शालेय शिक्षण घेतलेच नाही. ती लहान असल्यापासून तिचा परिवार वारंवार देशोदेशी स्थलांतर करीत असल्याने तिचे शिक्षण नीटसे होऊ शकले नाही. त्यामुळे ती आणि तिची भावंडे घरच्या घरीच शिकली. ज्याला होम एज्युकेशन म्हटले जाते.

Karishma kapoor : करिश्मा कपूर : हिने केवळ सहावी इयत्ते पर्यंतच शिक्षण घेतले आहे. लहानपणापासूनच करिश्माला बॉलीवूडचे आकर्षण होते व तिने अभिनेत्री होण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार तिने बॉलीवूडमध्ये करिअर केले.

Soha Ali Khan : सोहा अली खान : हिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मधून राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकीय संबंध या विषयांमध्ये पदवी घेतली आहे. तिने नवी दिल्ली येथील ब्रिटीश स्कूलमधून शिक्षण घेतले असून, तिने मॉडर्न हिस्ट्री या विषयाचा, ऑक्सफर्डमधील बालीओल कॉलेजमधून अभ्यास केला आहे.

Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा : हिने शालेय शिक्षण आर्य विद्या मंदिर, मुंबई येथे घेतले. तर कॉलेजचे शिक्षण तिने एसएनडिटी येथे पूर्ण केले. पुढे जाऊन तिने फॅशन डिझायनिंग या विषयामध्ये मुंबईमधून पदवी घेतली आहे.

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन : हिने स्थापत्यशास्त्र विषयामध्ये पदवी घेण्यासाठी रचना संसद अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळी तिला मॉडेलिंगची कामे येऊ लागल्याने तिने शिक्षण सोडून दिले, व तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला.

KBC : फक्त 1 मिस्डकॉल आणि जिंका 2 कोटी रुपये; हा रिअलिटी शो येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

E-Aadhar Card : आता खिशात ठेवा ई-आधारकार्ड… ते कसे? वाचा एका क्लिकवर

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues