Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज होणाऱ्या सुनावण्याबाबत कोर्टातून मोठे अपडेट आले समोर!!

0

अखेर खरी शिवसेना कुणाची? या प्रश्नाभोवती गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघाले आहे. याबाबत आज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. परंतु हि सुनावणी आता पुन्हा लांबणीवर गेली आहे. याबाबत सुप्रीम कोर्टातून मोठे अपडेट आले समोर आले आहे..

सुप्रीम कोर्टातून आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठापुढं सुरु आहे. या पाच न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती उद्या उपलब्ध नसल्यानं सुनावणी लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्याने आज होणारी सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. आता हि सुनावणी पुन्हा केव्हा होणार हे अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, राज्यातील सत्ता संघर्षाची मागील सुनावणी हि 1 नोव्हेंबरला झाली होती. यामध्ये ही सुनावणी चार आठवडे लांबणीवर गेली होती. त्यानंतर याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, आता ती पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues