Take a fresh look at your lifestyle.

प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी मिळतंय अनुदान; जाणून घ्या योजना!

0

मल्चिंग पेपरच्या वापराने पाण्याचे बाष्पीभवन न होता झाडांच्या मुळा भोवती ओलावा टिकून राहतो व उगवणारे तण नियंत्रणात, तापमान नियंत्रित ठेवता येते. या मल्चिंग पेपरच्या सहाय्याने आपण उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो. यासाठी सरकारने एक योजना सुरु केली आहे. त्यामाध्यमातून तुम्हाला अनुदान देखील मिळते. त्याबाबत जाणून घेऊयात…

किती अनुदान मिळणार? : प्लास्टिक मल्चिंग पेपरचा हेक्टरी खर्च 32 हजार असून त्यावर 50 टक्के अनुदान मिळते. यानुसार जास्तीत-जास्त हेक्‍टरी 16 हजार रुपये अनुदान मिळते. डोंगराळ भागांमध्ये प्रतिहेक्टर अनुदानाचे प्रमाण हे 36 हजार 800 रुपये इतक्या मापदंडानुसार आहे. या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच 18 हजार 400 रुपये प्रति हेक्‍टर याप्रमाणे 2 एकरसाठी हे अनुदान देय राहणार आहे.

योजनेसाठी पात्र कोण? : शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी समूह, सहकारी संस्था.

आवश्यक कागदपत्रे काय? :
● आधार कार्डची झेरॉक्स कॉपी.
● आधार लिंक असलेल्या बँक खात्याच्या पासबुक झेरॉक्स.
● जमिनीचा सातबारा उतारा.
● 8-अ प्रमाणपत्र.

लाभ घेण्यासाठी कुठे संपर्क करावा? : संबंधित कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करून तुम्ही योजनेविषयी अधिक माहिती मिळवू शकता.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues