Take a fresh look at your lifestyle.

लेमन ग्रासची शेती करा आणि लाखो कमवा!

0

तुम्ही ग्रामीण एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचारात असाल तर तुम्ही शेतीच्या व्यवसायात नशीब आजमवा. कारण, अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय (Farming) आरोग्याच्या दृष्टीने महत्व प्राप्त झालेल्या पिकांची मागणीही वाढत चालली आहे. अशा नगदी पिकांच्या शेतीमधून तुम्ही महिन्याकाठी लाखो रुपये कमावू शकता. त्याबाबत अधिक जाणून घेऊयात…

लेमन ग्रासची शेती फायदेशीर ठरणाऱ्या व्यवसायांपैकी एक मानली जाते. या गवताची लागवड करण्यासाठी अवघा 20 हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र, यामधून तुम्ही महिन्याकाठी लाखोंचे उत्पन्न कमावू शकता.

या लेमन ग्रासचा वापर कॉस्मेटिक, साबण, तेल आणि औषधे अशा अनेक उत्पादनांमध्ये होत असतो. याचमुळे बाजारपेठेत या ग्रासला मोठी मागणी आहे. विशेष बाब म्हणजे अगदी दुष्काळग्रस्त भागातही लेमन ग्रासची शेती होते. एका हेक्टरवर लेमन ग्रासचे पिक घेतल्यास तुम्हाला महिन्याला साधारण 4 लाख पर्यंतचे उत्पन्न मिळू शकते.

जनावरांकडून नुकसानीचा धोका नाही : या शेतीसाठी कुठल्याही खताची गरज नाही. तसेच गुरे किंवा जंगली जनावरांनी ही शेती उद्ध्वस्त करण्याचाही धोकाही नाही. एकदा पेरणी केली कि, पुढील सहा ते सात वर्षे हे पीक येत राहते. फेब्रुवारी ते जुलै हा लेमन ग्रासच्या पेरणीसाठी उत्तम काळ आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues