तरुणांनों असे घ्या…गरीबाच्या गाईकडून लाखोंचे उत्पन्न
• बंदीस्त शेळीपालनात योग्य नियोजन खूप महत्वाचे असते.
• चला तर मग जाणून घेऊया काय उपाययोजना केल्यावर बंदीस्त शेळीपालनात फायदा होईल.
१) प्रथमतः चांगल्या जातीच्या व उत्तम वंशावळ असलेल्या निरोगी शेळ्यांची निवड करावी.
२) शेडचे योग्य नियोजन करावे जेणेकरून शेळ्यांना मुक्त संचार करता येईल, गाभण व भाकड शेळ्या तसेच
करडांसाठी वेगळे कप्पे करावेत.
३) शेळ्यांची निवड करताना मांस उत्पादनासाठी उस्मानाबादी, बारबेरी, काठेवाडी व बकरी ईदच्या मार्केटसाठी
सोजत, जमुनापारी, बिटल, शिरोही, कोटा, तोतापुरी या जातींची निवड करावी.
४) दुध उत्पादनासाठी सानेन, सुरती, बिटल, काठेवाडी, या जातीच्या शेळ्यांची निवड करावी.
५) गाई व म्हैशीच्या पेक्षा शेळ्यांचा दुध उत्पादन खर्च कमी असतो व त्यांच्या तुलनेत शेळीच्या दुधाला
चांगला भावही मिळतो.
६) शेळ्या शक्यतो दुसऱ्या वेताच्या निवडाव्यात किंवा स्वतः च शेळ्या तयार करत असाल तर अती उत्तमच
आशा शेळ्यांची रोगप्रतिकारक क्षमता तसेच दूध उत्पादन क्षमता जास्त असते.
७) रोगप्रतिबंधक उपाय म्हणून शेळ्यांना वेळोवेळी लसीकरण करणे खूप गरजेचे असते.
८) शेळीपालनातील मुख्य उत्पादन स्रोत म्हणजे करडे त्याची 0 टक्के मरतुक व्हावी यासाठी जंतनाशक व
लसीकरण हे योग्य वेळी करणे खूप गरजेचे असते.
९) शेळीपालनात आहार नियोजन अत्यंत महत्वाचे आहे. कारण शेळ्यांचे प्रजनन, शेळ्या माजावर येणे व
गाभण राहणे हे शेळ्यांचे आरोग्य त्यांच्या संतुलित आहारावर अवलंबून असते.
१०) बंदिस्त शेळीपालनात खाद्याचे नियोजन करताना योग्य प्रतीचा मुरघास, सुबाभूळ, तुती, शेवरी,
मेथीघास, स्टायलो, हेमाटा, मका यासारख्या प्रोटीन युक्त चाऱ्याचा समावेश करावा.
११) खाद्याचे नियोजन करताना वर्षभर पुरेल एवढा सुका चारा, सहा महिने पुरेल एवढा ओला चारा व तीन
महिने पुरेल एवढा खुराकाचा आपल्या फार्मच्या गरजे इतका साठा करावा म्हणजे वेळीची व लेबरची बचत
होईल.
१२) करडे अडीच ते तीन महिन्यांची होई पर्यंत त्यांची वाढ ही शेळीच्या दुधावरच करावी त्यामुळे त्यांचा खर्च
कमी होतो.
१३) एका शेळीपासून दिवसाला साधारणत किमान ६५० ते ७०० ग्रॅम लेंडी खत व एका करडापासून ३०० ते
३५० ग्रॅम लेंडीखत मिळते त्यामुळे हा एक बंदीस्त शेळीपालनातून मिळणाऱ्या उत्पादनाचा चांगला पर्याय
आहे.
१४) लहान बोकडे बाजारातून खरेदी करून त्यांच्या आहाराचे, चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास ३ ते ४
महिन्यात ही बोकडे विक्रीसाठी तयार होतात, हा पर्याय बंदीस्त शेळीपालनात भरघोस उत्पादन देणारा आहे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup
टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून
Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…
लेखक-
राहुल गलंडे,नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल[email protected]