Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पशुपालकांनों काय आहे? बहुउद्देशीय गोठा तंत्रज्ञान…

0

१) मुक्त संचार गोठा निर्मितीसाठी खर्च खूप कमी येतो.
२) गोठ्याची साफ सफाई व निर्जंतुकीकरणासाठी वेळ खूप कमी लागतो.
३) मुक्तसंचार गोठ्यामध्ये जनावरांचा भरपूर व्यायाम होतो त्यामुळे पोटाचे आजार कमी होतात तसेच
माजावर आलेली जनावरे लवकर ओळखता येतात.
४) जनावरांचे पचन चांगले झाल्याने जनावरे तजेलदार दिसतात व दुधातील फॅट व एस.एन.एफ मध्ये
वाढ होते परिणामी आरोग्य सुधारते.
५) गोठ्यात जनावरे फिरल्यामुळे जनावरांची भूक वाढते,भरपूर पाणी पितात तसेच स्थूलपणा कमी होऊन
प्रजनन क्षमता वाढते व आपोआप खत निर्मिती होते.
६) जनावरे आजारी न पडल्याने कोणतेही इंजेक्शन द्यावे लागत नाही त्यामुळे तणावमुक्त व
अँण्टीबायोटिक मुक्त दूध मिळते.
७) या गोठ्यामुळे जनावरांची खुरे सदृढ आणि कडक राहतात तसेच गाई-म्हशी आपोआप वितात,वार
लवकर पडतो त्यामुळे डॉक्टरांवरचा खर्च कमी होतो.


८) सूर्यकिरण अंगावर पडल्याने ‘ड’ जीवनसत्व मिळते त्यामुळे त्वचारोग,अंगाला खाज किंव्हा त्वचेला
जखमा यापासून जनावरांची मुक्तता होते.
९) गव्हाणीत शिल्लक राहिलेल्या चाऱ्याची कुट्टी कुजण्यासाठी आपण ती मुक्त गोठ्यात टाकू शकतो
त्यामुळे काडी कचऱ्याचा प्रश्न निर्माण होत नाही.
१०) जनावरे स्वतःहून पाहिजे त्या वेळेस खरारा करतात त्यामुळे गाई-म्हशींवरील ताण कमी झाल्याने
त्या हवा तास वातावरणाचा उपयोग करून घेतात.
११) या गोठ्यात शेण काढावे तसेच पाणी पाजावे लागत नाही उलट जनावरे चारा,पाणी व खनिज मिश्रणे
आवडीने खातात त्यामुळे तंदरुस्त व आनंदी राहतात.
१२) जनावरांना आरामासाठी शेणखताची मऊ गादी तयार होते त्यामुळे उठताना त्रास होत नाही जनावरे
भरपूर वेळ विश्रांती घेतात त्यामुळे रवंतपणा वाढून पचनव्यवस्था सुधारते.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून
Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…

लेखक-
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल[email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews