Take a fresh look at your lifestyle.

क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय? जाणून घ्या!

0

विशेषतः पावसाळ्यात क्यूसेक आणि टीएमसी सारखे शब्द कानावर पडतात. मात्र क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे नक्की काय? याबाबत आज जाणून घेऊया..

धरणातील पाणीसाठा मोजायचा असेल किंवा आणि त्यातून सोडलेले पाणी मोजायचे असेल तर त्यासाठी वेगवेगळी परिमाणं वापरली जात असतात. पाणीसाठा ‘टीएमसी’ आणि ‘दलघमी’मध्ये तर नदीतून वाहणार्‍या पाण्याचा वेग किंवा धरणातून सोडणार्‍या पाण्याचा वेग मोजण्यासाठी ‘क्युसेक’ आणि ‘क्युमेक’ ही परिमाणं वापरली जातात.

क्यूसेक आणि क्यूमेक म्हणजे काय? :

● ‘क्युसेक्स’ म्हणजे ‘घनफूट प्रतिसेकंद’.
● ‘क्युमेक्स’ म्हणजे ‘घनमीटर प्रतिसेकंद’.
● सध्या धरणातून किंवा एखाद्या बंधार्‍यावरुन एका सेकंदाला किती घनफूट किंवा घनमीटर पाणी वाहतं आहे? हे यावरुन कळतं.
● 1 क्यूसेक म्हणजे अंदाजे 29 लिटर पाणी (28.3 लिटर).
● 1 क्यूमेक म्हणजे अंदाजे 1000 लिटर पाणी.

उभ्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी दोन शब्द | मी शेतकरी बोलतोय | Krushidoot

टीमसी म्हणजे नक्की किती? :

● धरणातील पाणीसाठा मोजण्यासाठी टीएमसी हे परिमाण आहे.
● 1 टीमसी म्हणजे One Thousand Million Cubic Feet म्हणजेच 100 कोटी घनफूट पाणी.
● ‘दलघमी’ म्हणजे दहा लाख घनमीटर पाणी.
● 1 टीएमसीमध्ये 28 अब्ज (2800 कोटी) लिटर पाण्याचा समावेश असतो.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.