Take a fresh look at your lifestyle.

Tricks and Tips : हि सोपी पद्धत वापरून करा धुक्यापासून कांदा पिकाचे संरक्षण

0

Tricks and Tips : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कांद्याची शेती पाहायला मिळते. सध्या कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. मात्र तरीदेखील शेतकरी बांधवांचा मदार हा कांदा पिकावरच आहे. कांदा बाजारभावाचा लहरीपणा नेहमीच शेतकऱ्यांच्या मुळावर उठतो, पण असे असतानाही नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, खानदेश, मराठवाडा, विदर्भ जवळपास राज्यातील सर्वच भागात या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. (Protection of onion crop from fog)

धुक्यात कांदा पिकाची काळजी अशी घ्यावी.

  • हिवाळ्याच्या दिवसात कांद्याच्या पातीवर जे मोठ्या प्रमाणात दव साठलेले असते. ते काढणे गरजेचे असते. यासाठी प्रेशर पंपाच्या सहाय्याने पाण्याचे फवारणी करू शकता. त्यामुळेपातीवरील धुके नाहीसे होऊन जाईल.
  • दुसरा उपाय म्हणजे सिलिकॉन बेस स्टिकर ची पाण्यात मिसळून फवारणी करू शकता.
  • धुके ज्या वेळी पडत असेल त्याच वेळी पिकावर फवारणी घेणे गरजेचे असते. दुपारी फवारणी घेऊ नये. तसेच पिकावर बुरशीनाशकांची फवारणी करू शकता.
  • ज्या शेतकऱ्यांचा कांदा स्प्रिंकलर किंवा रेन पाइप वर आहे त्यांनी सकाळच्या धुक्याच्या वेळात पाच ते दहा मिनिटांसाठी स्प्रिंकलर सुरू करावी.
  • डोक्यावर पूर्वीपासून चालत आलेला एक उपाय आहे ते म्हणजे पूर्वीच्या काळी शेतकरी लिंबाच्या पाल्याने कांद्याच्या पाठीवरीलधुकझटकायची. हा देखील उपाय उत्तम आहे.
  • तसे पाहिल्यास कांदा पिकाला रोजच्यारोज फवारणीची आवश्‍यकता नसते. मात्र रोजच जर धुके पडत असेल तर तीन दिवसातून एकदा बुरशीनाशकाची फवारणी करावी. शक्यतो द्रव स्वरूपातील बुरशीनाशकाचा वापर करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues