Take a fresh look at your lifestyle.

thackeray groups mashal symbol : ठाकरे गटाचं मशाल चिन्हही धोक्यात?

0

thackeray groups mashal symbol : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी एक मोठा निर्णय दिला. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आलं. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, त्यांना आता येणाऱ्या निवडणूकीत मशाल या चिन्हाचाच वापर करावा लागणार आहे.

मात्र, इथेही ठाकरे गटाच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाही. कारण, मशाल चिन्हाविरोधातही निवडणूक आयोगात एका व्यक्तीने निवेदन दिलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दिलेलं मशाल हे निवडणूक चिन्ह काढून घ्यावं, अशी मागणी समता पक्षाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन कैलाश कुमार नामक व्यक्तीने निवडणूक आयोगाकडे दिलं आहे.

आज दुपारपर्यंत समता पक्षाचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आहे. समता पक्षाचे अध्यक्ष उदय मण्डल यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचं मशाल चिन्हही बाद होतंय का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues