Take a fresh look at your lifestyle.

Govt scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! आता बिझनेस सेट करण्यासाठी सरकारकडून मिळणार 15 लाख

0

आपल्या सर्वांना माहिती आहे कि, भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. भारतातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या हि शेतीवर अवलंबून आहे. परंतु असे असले तरी हवामानाच्या लहरीपणापासून वाचण्यासाठी तसेच आपली पिके बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांना अजूनही पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यांना मदत करण्यासाठी सरकारने एक भन्नाट सरकारी योजना आणली आहे, या योजनेचे नाव पीएम किसान एफपीओ (PM Kisan EPFO) योजना असे आहे.

या योजनेअंतर्गत, तुम्हाला 11 शेतकऱ्यांचा समूह अर्थात शेतकरी उत्पादक संघटना (FPO/FPC) असेल तर यांना शेतीशी संबंधित सर्व व्यवसाय सेटअपसाठी मोदी सरकार तुम्हाला 15 लाख रुपयांची मदत करणार आहे.

या योजनेचा उद्देश काय?

PM किसान एफपीओ योजनेचा उद्देश शेतकर्‍यांना स्वावलंबी बनवून आर्थिक संकटातून दिलासा देणे हा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी (FPO) स्थापन करावी लागेल, ज्यामध्ये किमान 11 शेतकरी असावेत. FPO ही शेतकरी आणि उत्पादकांची एकात्मिक संघटना आहे जी शेतकऱ्यांसाठी काम करत आहे.

काय आहे सरकारचे लक्ष्य?

  • शेतकऱ्यांच्या आर्थिक (Financial) विकासासाठी आणि कल्याणासाठी 2023-24 पर्यंत सरकारने 10,000 FPO तयार करणे.
  • शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी आणि बाजारातून योग्य परतावा मिळावा यासाठी ठोस पावले उचलली जातात.
  • नवीन FPO ला 5 वर्षांपर्यंत सरकारकडून हात धरून आणि समर्थन प्रदान करणे.
  • आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये कृषी-उद्योजक कौशल्ये विकसित करणे.

या योजनेसाठी कसा अर्ज करावा :

  • तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटला https://www.enam.gov.in भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर FPO ऑप्शन पेज उघडेल. जिथे क्लिक केल्यावर नोंदणी किंवा लॉगिनसह नवीन पेज उघडेल. येथे सर्व माहिती भरून तुम्ही सहजपणे या योजनेचा लाभ घेऊ शकता.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही गोष्टीमध्ये बदल असू शकतात. यामुळे वाचकांनी वरील माहितीची खात्री करून घ्यावी

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues