Good News : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; या कर्मचाऱ्यांची यंदाची संक्रांत होणार गोड
शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील 90 हजार कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून शिंदे सरकारच्या या निर्णयनंतर राज्यातील 90 हजाराहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांची (ST employees salary) यंदाची संक्रांत गोड होणार असल्याचे सांगण्यात येते आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे मागील काही महिन्यापासून रखडलेले पगार आजच होणार असल्याचा मोठा निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. मिळलेल्या माहितीनुसार, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 300 कोटी रुपये वितरित केले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची संक्रात गोड होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार झालेला नव्हता. त्यामुळे एसटी मागील काही दिवसांपासून चांगलाच कर्मचारी आक्रमक झाले होते. संपादरम्यान पगारासाठी 4 वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचे सरकारनं मान्य केलं होतं. मात्र ते पाळण्यात येत नसल्यामुळे 90 हजार एसटी कर्मचारी नाराज होते. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मात्र आता पगारची घोषणा केल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे.