Take a fresh look at your lifestyle.

Voter ID Download : आता घरबसल्या तुम्ही करू शकता व्होटर कार्ड डाउनलोड; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

0

आपल्याला अनेकदा सरकारी किंवा खासगी संस्थांमध्ये कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी ओळखपत्राची गरज हि आवर्जून लागते. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, पासपोर्ट, इलेक्ट्रिसिटी बिल आदी बाबी ओळखीचा किंवा रहिवासाचा पुरावा देतात. त्याचप्रमाणे, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदारांकडे स्वत:चं ओळखपत्र म्हणजेच व्होटर आयडी कार्ड असणं हे गरजेचे असते.

यासाठी मतदाराच नाव मतदारयादीत असणंही हे खूप आवश्यक असतं. मतदारयादीत नाव या यादीत नसेल तर आपल्याला मतदान करता येत नाही. परंतु, नाव मतदारयादीत असेल आणि व्होटर आयडी कार्ड नसेल तर काळजीचं कारण नाही. निवडणूक आयोगाने मतदारांसाठी अगदी काही मिनिटांत व्होटर आयडी कार्ड मिळवून देण्याची सोय केली आहे. होय हे खरचं शक्य आहे.. काय आहे याची प्रोसेस जाणून घ्या थोडक्यात…

व्होटर कार्ड डाउनलोड करण्यासाठीच्या स्टेप्स पुढीलप्रमाणे :

  1. सगळ्यात पहिल्यांदा निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. https://voterportal.eci.gov.in किंवा https://nvsp.in/
  2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी स्वतःच्या नावाची नोंदणी एनव्हीएसपी पोर्टलवर करणं आवश्यक आहे.
  3. नोंदणी केली नसेल, तर नोंदणी करा आणि मगच पुढे जा.
  4. स्वत:ची मूलभूत माहिती देऊन अकाउंट रजिस्टर करू शकाल.
  5. रजिस्ट्रेशनंतर एनव्हीएसपी पोर्टलवर लॉग इन करा. ज्यांचं रजिस्ट्रेशन यापूर्वीच झालं आहे, अशांनी थेट एनव्हीएसपी पोर्टलवर लॉग इन करावं.
  6. यानंतर स्वत:च्या इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्डवरचा नंबर टाकून किंवा फॉर्म रेफरन्स नंबर टाकून राज्य सिलेक्ट करा.
  7. तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी येईल.
  8. ओटीपी टाकल्यावर व्होटर कार्ड डाउनलोड करण्याचा ऑप्शन तुम्हाला येईल.
  9. ‘डाउनलोड ई-एपिक’वर क्लिक करा.
  10. यानंतर व्होटर कार्डची पीडीएफ फाइल डाउनलोड होईल.
  11. तुम्ही तुमचं ई-एपिक किंवा पीडीएफ स्वरूपातलं व्होटर कार्ड सेव्ह करू शकता किंवा त्याची प्रिंटही घेऊ शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues