Take a fresh look at your lifestyle.

आता 21 नव्हे तर फक्त 7 कागदपत्र देऊन मिळणार तुम्हाला तुमच्या हक्काचे घर

0

आपल्या पैकी सर्वांचं आपल्या स्वप्नातील स्वतःचे घर घेण्याची इच्छा हि असतेच. आता लवकरच तुमच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे. कारण लवकरच म्हाडाकडून मुंबई आणि पुण्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. तर मुंबईतील घरांसाठी आजपासून रजिस्ट्रेशन देखील सुरू झालं आहे.

आजपर्यंत म्हाडाच्या लॉटरीमध्ये (Mhada Lottery 2023) साधारण 21 कागदपत्र जमा करावी लागायची. याशिवाय महाडाची प्रक्रियाही अतिशय किचकट होती. त्यामुळे अर्ज करण्यात अनेक समस्या यायच्या. परंतु आता चिंता घेण्याची कोणतीही गरज नाही.. कारण घर खरेदी करण्यासाठी आता कागदपत्रांची संख्या आधीच्या प्रमाणात खूप कमी करण्यात आली आहे. लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्जदारांना आता 21 नव्हे तर फक्त 7 कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

कोणती 7 कागदपत्र आवश्यक :

महाडच्या लॉटरीची आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड, पॅनकार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्र, जात प्रमाणपत्र आणि त्या प्रवर्गाचा दाखला यांचा समावेश आहे. याआधी कागदपत्र जास्त असल्याने ती पडताळण्यासाठी खूपदा वेळा लागायचा व त्यामुळे इतर प्रक्रियाही उशिराने होत असायची. परंतु आता कागदपत्र कमी केल्याने लॉटरीची प्रक्रिया देखील जलद गतीने होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 2023 सालची म्हाडाची लॉटरी ही यापूर्वी जारी करण्यात आलेल्या सर्व लॉटरींपेक्षा वेगळी असणार आहे. आता तुम्हाला सारखं रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही. एकदा रजिस्ट्रेशन केलं की त्या आयडीवरून तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues