Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कमी खर्चात पाणी शुद्ध करण्याचे पर्याय; ते ही वॉटर प्युरिफायरचा वापर न करता

0

आपण जे पाणी पितो ते शुद्ध नसेल, तर तेच पाणी शरीराला अपायकारक ठरून निरनिरळ्या रोगांसाठी कारणीभूत ठरू शकते. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी आपल्यासाठी हितकारक ठरते. वॉटर प्युरिफायरचा वापर न करता पाणी शुद्ध करण्याचे पर्याय आपण पाहू.

साठवणे आणि निवळणे :
पाणी भांड्यात गाळून, साठवून स्थिर ठेवल्यानंतर काही वेळ जाऊ दिला तर गाळ खाली बसतो. 24 तास स्थिर ठेवून पाणी वापरल्यास त्यातले 90% जंतू नष्ट झालेले असतात.
तुरटी फिरवून ही क्रिया लवकर होते. ही सर्वात स्वस्त व सोपी पद्धत आहे. पण पावसाळ्यात विशेषत: साथीच्या आजारांच्या काळात पाणी साठवून, निवळून औषध टाकलं तर आणखी चांगलं.

पाणी उकळणे :
पाणी शुद्ध करण्यासाठी पाणी गॅसवर उकळायला ठेवावं. पाण्याला एकदा उकळी फुटल्यानंतर पुढे किमान पाच मिनिटं पाणी उकळत ठेवावं. पाणी शुद्ध करण्याचा हा सोपा आणि खात्रीचा पर्याय आहे.

शेवग्याच्या बिया आणि शुद्धीकरण :
तुरटीच्या ऐवजी शेवग्याच्या बियांची पूड वापरून पाणी निवळता येतं. यासाठी प्रथमत: वाळलेल्या शेवग्याच्या शेंगा घेऊन त्यातील बिया काढून घ्याव्यात. टरफलं काढल्यानंतर सफेद दिसणार्‍या बियांची बारीक पावडर करून घ्यावी हि पावडर पाण्यात टाकावी. बियांची पावडर टाकल्यानंतर पाणी एक तासानंतर गाळून घ्यावं.

रासायनिक शुद्धीकरण :
ब्लिचिंग पावडर वापरून पाणी निर्जंतूक करता येतं. हा उपाय मुख्यत: ग्रामीण भागात हमखास करावा.

रात्री झोपण्यापूर्वी काय करावे व काय करू नये?

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews