Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कंपन्या फ्लेक्स फ्युएलसह बाईक्स सादर करणार? यादी वाचा!

0

महागडे पेट्रोल आणि वाढते प्रदूषण यांसारख्या समस्या जनतेसह सरकारलाही सतावत आहेत. आगामी काळात या दोन्ही प्रमुख समस्या सुटू शकतात. तेल कंपन्यांबरोबरच दुचाकी कंपन्याही फ्लेक्स फ्युएलसारख्या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात.

सुझुकी : जपानी दुचाकी निर्माता कंपनी सुझुकी देखील फ्लेक्स इंधन तंत्रज्ञानावर काम करत आहे. Gixxer या तंत्रज्ञानासह कंपनी लॉन्च करणार आहे. सध्या, कंपनी आपल्या प्रोटोटाईप मॉडेलवर तंत्रज्ञानाची चाचणी करत आहे. त्याची चाचणी कंपनी Gixxer च्या 250 cc व्हेरियंटवर करत आहे.

Royal Enfield : The Classic 350 ही प्रतिष्ठित बाईक निर्मात्या रॉयल एनफिल्डने फ्लेक्स इंधन तंत्रज्ञानासह सादर केलेली पहिली असू शकते. अलीकडेच ही बाईक कंपनीने सियामच्या कार्यक्रमात दाखवली होती.

यामाहा : आणखी एक जपानी कंपनी यामाहा देखील फ्लेक्स इंधन बाइक तयार करण्यात गुंतलेली आहे. कंपनीकडून हे तंत्रज्ञान पहिल्यांदा आणणारी बाईक FZ15 आहे.

Hero MotoCorp : भारतीय कंपनी हिरो देखील फ्लेक्स इंधन तंत्रज्ञानामध्ये मागे राहू इच्छित नाही. कंपनीकडून या तंत्रज्ञानासह येणारी पहिली बाईक Glamour Xtec आहे. या बाईकचे प्रोटोटाईप व्हर्जन हिरोने सियाम इव्हेंटमध्ये सादर केले होते. कंपनी सध्या या बाईकवर अनेक प्रकारचे टेस्टिंग करत आहे.

बजाज ऑटो : आणखी एक भारतीय कंपनी बजाज ऑटो देखील फ्लेक्स इंधन तंत्रज्ञानावर काम करत आहे. या तंत्रज्ञानासह आणली जाणारी कंपनीची पहिली बाईक बजाजची पल्सर 160 बाईक असेल.

फ्लेक्स फ्युएल बाईक कधी येणार? : 2023 सालापासून देशातील सर्व पेट्रोल पंपांवर 20 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले पेट्रोल उपलब्ध होईल. त्यानंतर 2024 मध्ये या तंत्रज्ञानाच्या बाईक कंपन्या सादर करतील. SIAM इव्हेंटमध्ये TVS चे KN राधाकृष्णन म्हणाले की 2024 मध्ये प्रत्येक कंपनीकडून फ्लेक्स इंधन तंत्रज्ञानासह किमान एक उत्पादन लॉन्च करण्याचा सर्व दुचाकी उत्पादकांचा प्रयत्न असेल.

हेही वाचा : ‘या’ 5 बँका देत आहेत स्वस्तात गृहकर्ज, घर घेण्याचा विचार करत असाल तर नक्की वाचा!

हेही वाचा : ड्रोन खरेदीसाठी 4 लाखांचे अनुदान, सरकारचा मदतीचा हात!

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues