Take a fresh look at your lifestyle.

QR Codes On Medicine आता येणार ‘औषधांचं आधारकार्ड’! औषधांच्या पाकिटावर QR Code अनिवार्य होणार

0

QR Codes On Medicine केंद्र सरकारकडून आता पुढील वर्षांपासून औषधांवर बारकोड अथवा QR Code लावणं अनिवार्य होणार. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याच्या हालचाली सुरू झाल्यात. देशात विक्री होणाऱ्या औषधांच्या पाकिटांवर बारकोड अनिवार्य करण्यासाठी केंद्र सरकारने मागील वर्षी ड्रग्ज अॅण्ड कॉस्मेटीक रुल्स 1945 कायद्यात दुरुस्ती करत त्यात अनुसूची एच2 जोडली. या निर्णयामुळे उत्पादन आणि वितरण साखळीच्या माध्यमातून औषधांची सत्यता पडताळणी शक्य होणार. यातून बनावट औषधांना आळा बसणार असल्याचं म्हटलं जातंय.

QR Codes On Medicine पुढील वर्षी 1 ऑगस्ट 2023 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार. या निर्णयाला ‘औषधांचं आधारकार्ड’ असं म्हटलं जाणारंय. या युनिक क्यूआर कोडमध्ये औषधाबाबतची सर्व माहिती असणारय. यात उत्पादनाचे आयडेंडिटीफिकेशन कोड, औषधाचं नाव आणि जेनेरिक नाव, ब्रॅण्डचं नाव, उत्पादकाचं नाव आणि पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, औषधाची मुदत, उत्पादकाचा परवाना क्रमांक आदी माहितीचा समावेश असणारय.

हेही वाचा : मोबाईल नंबर आता आधार कार्डला जोडले जाणार; सरकार नवीन नियम आणण्याच्या तयारीत

QR Codes On Medicine केंद्र सरकारकडून या नव्या निर्णयाची माहिती देण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी देशभरातील केमिस्ट आउटलेटवर प्रचार केला जाणार असल्याची माहिती मिळतेय. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलीय.

QR Codes On Medicine भारतात अॅलेग्रा, डोलो, ऑगमेंटिन, सॅरिडॉन, कॅल्पोल आणि थायरोनॉर्म यांसारख्या औषधांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. या औषधांसह जवळपास 300 औषधे बारकोडसह बाजारात दाखल होणारंय. सध्या, पहिल्या टप्प्यात 300 औषधं बारकोडसह येणार आहेत. या 300 औषधांचा भारतीय बाजारपेठेतील वाटा 35 टक्क्यांच्या घरात आहे. त्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत इतर सर्व औषधांवर क्यूआर कोड असणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues