Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Krushidoot : 5G Data : मोबाईल डेटा लवकर संपणार का? ‘5 जी’ बद्दल ‘हे’ प्रश्न तुम्हालाही पडलेत का ? मग वाचा उत्तरे

0

5G Data देशातील काही शहरांमध्ये 5 जी इंटरनेट सेवा सुरू झाली असली तरी या सेवेत अनेक अडचणी येत आहेत. एअरटेल, जीओ कंपन्या 5 जी सेवा देत आहे. ही सेवा वापरण्याबाबत ग्राहकांमध्ये काही शंका आहेत. त्यात वेगवान इंटरनेटमुळे डेटा लवकर संपतो का?, त्याची किंमत किती आहे, याबाबत जाणून घेऊया…

5G Data एअरेटलची 5 जी प्लस सेवा ही सध्या बारा शहरांमध्ये सुरू आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, गुडगाव, गुवाहाटी, पानीपत, पुणे, नागपूर, वाराणसी या शहरांत ही सेवा सुरू आहे. जीओची 5 जी नेटवर्कही सेवा मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, वाराणसी, कोलकाता, पुणे, गुडगाव, नोयडा, गाझियाबाद, बेंगळुरु आणि फरिदाबाद या शहरात ही सेवा सुरू झाली आहे.

5G Data ही सेवा कशी मिळवाल?

एअरटेलची 5 जी नेटवर्क सेवा मिळविण्यासाठी तुमचा मोबाइल निर्मात्याने सांगितल्या प्रमाणे अपडेट करावे लागेल. तर त्यानंतर 5 जी सेवा सुरू होईल. जिओची 5 जी सेवा ही सध्या टेस्टिंग प्रक्रियात आहे. कंपनीकडून सेवेबाबत निमंत्रण दिल्यास स्वॉफ्टवेअर अपडेट करायचे आहे. जीओची सेवा ही 239 रुपयांपेक्षा जास्त प्लॅनमध्ये उपलब्ध राहील.

5G Data 5 जी सेवेसाठी पैसे भरावे लागतील?

5 जी सेवा मिळविण्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे मोजावे लागणार नाहीत. तुम्ही 4 जी नेटवर्कसाठी जे रिचार्ज करता, त्यामध्येच 5 जी सेवा मिळणार आहे. प्रीपेड, पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी हाच नियम आहे.

5G Data डाटा लवकर संपेल का?
4 जी पेक्षा ५ जी वेगवान आहे. त्यामुळे डेटा लवकर संपेल का? याचे उत्तर हो आणि नाही दोन्हीमध्ये आहे. ५ जीमुळे डाउनलोडही वेगात होईल. त्यामुळे तुम्ही वेगाने गाणे, चित्रपट व इतर बाबी डाउनलोड करू शकतात. त्यामुळे डेटाही वेगात संपेल. त्यामुळे किती डेटा वापरायचे हे युझर्सवरती अंवलबून आहे.

हेही वाचा : आता येणार ‘औषधांचं आधारकार्ड’! औषधांच्या पाकिटावर QR Code अनिवार्य होणार

5G Data काही मिनिटांत डेटा संपेल?

5 जीमध्ये काही मिनिटांत डेटा संपेल, असे वापरकर्ते म्हणत आहे. त्याचे कारण आहे, डेटाचा वेग जास्त आहे. डेटा वेगात ट्रान्सफर होतो. त्यामुळे आपल्याला काही मिनिटांत डेटा संपतो, असे वाटेल.

5G Data स्पीड टेस्टमध्ये डेटा संपतो?
टेस्ट स्पीडसाठी अॅप जास्त डेटा वापरता. त्यामुळे जास्त डेटा वापरला जातो. त्यामुळे सातत्याने 5 जीची स्पीड टेस्ट करू नका. हे केल्यास डेटा लवकर संपेल.

5G Data ५ जी मध्ये डेटा कसा वाचवाल?
आपण आपल्या मोबाइलमध्ये डेटा सेव्हर आणि अॅपचा वापर करू शकतो. त्यात तुम्ही लिमिटेड डेटा वापरू शकतात. ते तुम्ही डेटा वापरण्याबाबत अलर्ट देतील.

5G Data सर्वांना 5 जी सेवा कधी उपलब्ध होईल?
5 जी सेवा ही येत्या वर्षात सर्वांना उपलब्ध होऊ शकते. जीओची कंपनीची सेवा देशात 2023 अखेरपर्यंत मिळेल. तर एअरटेलची सेवा मार्च 2023 मध्ये उपलब्ध होईल.

5G Data 5 जी सेवाचे विस्तारीकरण झाल्यास सेवा महाग होईल ?
देशभरात या सेवेचे विस्तारीकरण झाल्यानंतर ५ जी रिचार्ज प्लॅन ४ जी प्लॅनपेक्षा महाग होतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews