Take a fresh look at your lifestyle.

मोबाईल नंबर आता आधार कार्डला जोडले जाणार; सरकार नवीन नियम आणण्याच्या तयारीत

0

जगभरात दिवसंदिवस ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. एवढेच नव्हे तर मोबाईल कॉलिंग हा आजकालच्या फसवणुकीचा नवा अड्डा बनत चालला आहे. म्हणजे मोबाईलवरून कॉल करून बँक फ्रॉडसारख्या घटना घडत आहेत. बनावट मोबाईल नंबर असल्याने अशा लोकांना ओळखणे कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून मोबाईल कॉलिंगमध्ये मोठे बदल केले जात आहेत, जेणेकरून खोटे कॉल करणाऱ्यांवर अंकुश ठेवता येईल.

सरकार आणि ट्राय संयुक्तपणे एक नवीन प्रणाली सुरू करणार आहेत, ज्यामध्ये कॉलरचा फोटो त्याच्या मोबाइल नंबरसह दिसेल. यासाठी सरकार मोबाईल नंबर केवायसी प्रणाली लागू करत आहे.

आधार कार्डशी मोबाइल नंबर असा करा रजिस्टर

▪️ सर्वात प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर तुमच्या जवळील आधार केंद्र शोधा. अथवा थेट https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx या लिंकवर क्लिक करा.

▪️ ऑफलाइन नंबर अपडेटसाठी तुम्हाला जवळील आधार केंद्रावर जावे लागेल व तुम्ही त्वरित नंबर अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागेल.

▪️ आधार करेक्शन फॉर्म भरा व जो मोबाइल नंबर अपडेट करायचा आहे तो द्या.

▪️ करेक्शन फॉर्म सबमिट करा व Authentication साठी बायोमेट्रिक्स प्रदान करा.

▪️ त्यानंतर तुम्हाला Update Request Number (URN) असलेली पावती मिळेल. अथवा नंबरवर मेसेज येईल.
आधार अपडेशन ट्रॅक करण्यासाठी तुम्ही यूआरएनचा वापर करू शकता.

▪️ मोबाइल नंबर आधारशी लिंक झाल्यानंतर तुम्हाला आधारशी संबंधित डिटेल्स, व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी येण्यास सुरुवात होईल.

▪️ तुम्ही UIDAI चा टोल-फ्री नंबर 1947 वर देखील कॉल करून आधार अपडेटची माहिती घेऊ शकता.

असे केल्यास काय फायदा होईल?

ही प्रणाली कार्यान्वित होताच कॉल रिसिव्हरला कळेल की त्यांना कोण कॉल करत आहे. कॉल करणारा व्यक्ती आपली वैयक्तिक माहिती लपवू शकणार नाही आणि फसवणूकीला आळा बसू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues